राजारामपुरी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजारामपुरी कारवाई
राजारामपुरी कारवाई

राजारामपुरी कारवाई

sakal_logo
By

अतिक्रमण काढून घेण्यास
८ दिवसांची मुदत
कोल्हापूर ः राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावरील सेटबॅकमधील अतिक्रमणांवर महापालिकेने मार्किंग करून दिले असून ते काढून घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. तीन दिवसांच्या सुटीनंतर कारवाई थांबल्याचे चित्र होते. मुदत संपल्यानंतर पुन्हा कारवाई केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने राजारामपुरीतील तीन महत्त्वाच्या गल्लींमधील सेटबॅकमधील अतिक्रमण हटवण्याची धडक कारवाई केली. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे उतरवून घेतली. शनिवारपासून तीन दिवस सलग सुट्या आल्याने कारवाई केली नाही. तत्पूर्वी महापालिकेने मेन रोडवरील अतिक्रमणांवर मार्किंग करून दिले आहे. त्या मार्किंगच्या आतच व्यवसाय करण्यास सांगितले असून त्यापुढील बांधकाम, स्ट्रक्चर काढून घेण्यास आठ दिवसांची मुदत दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59189 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top