
‘कासारसडा माईन्स मार्गावरील धोकादायक झाडे काढा’
22618
कासारसडा : बेळगाव- वेंगुर्ला मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर अशी धोकादायक झाडे आहेत. (छायाचित्र : संजय ढेरे, चंदगड)
‘कासारसडा माईन्स मार्गावरील
धोकादायक झाडे काढा’
चंदगड : चंदगड ते बेळगाव- वेंगुर्ला मार्गाला जोडणाऱ्या वाली पंप मार्गे कासारसडा माईन्स रस्त्यावर अनेक झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या मार्गावर सतत वर्दळ असल्याने वाहनधारक आणि प्रवाशांसाठी ती धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ती पावसाळ्यापूर्वी काढावीत, अशी मागणी होत आहे.
चंदगड-शिरगाव फाटा या नेहमीच्या वाहतुकीच्या मार्गावर दोन ठिकाणी मोऱ्यांचे बांधकाम सुरू असल्यामुळे हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे बहुतांश वाहतूक कासारसडा माईन्समार्गे सुरू आहे. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी झाडे धोकादायक स्थितीत आहेत. काही झाडे तर कोलमडलेल्या स्थितीत आहेत. वादळी वारा झाल्यास ही झाडे उन्मळून पडू शकतात. याचे गांभीर्य विचारात घेऊन बांधकाम विभागाने तातडीने अशी धोकादायक झाडे काढून घ्यावीत, अशी मागणी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59274 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..