
डॉ. प्रभु बातमी
22682
सरकारी कार्यक्रमात
डॉ. प्रभू प्रमुख पाहुणे
कोल्हापूर, ता. १८ ः मिरज सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीदान कार्यक्रमाला येथील विन्स हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रूभ यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. या महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्री, आमदार किंवा सरकारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त प्रभू यांच्या रूपाने एका वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या डॉक्टरांना हा सन्मान मिळाला आहे.
मिरजेच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात २०१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच झाला. या महाविद्यालयात देशभरातील विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय या कार्यक्रमाला त्यांचे आई-वडील व इतर नातेवाईक मिळून १२०० लोक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील तर अन्य उपस्थितांत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश होता.
सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यावेळी डॉ. प्रभू यांनी पालकमंत्री या नात्याने जयंत पाटील यांना दि प्रज्वलन करण्याची विनंती केली, पण पाटील यांनीही तुम्ही प्रमुख पाहुणे आहात, तुम्हालाच हा मान असल्याचे सांगत डॉ. प्रभू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. प्रभू यांनी वैद्यकीय व्यवसायासमोरील आव्हानांवर कशी मात करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59341 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..