आजऱ्यात २१ हजार ९८५ हेक्टरवर खरीप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात २१ हजार ९८५ हेक्टरवर खरीप
आजऱ्यात २१ हजार ९८५ हेक्टरवर खरीप

आजऱ्यात २१ हजार ९८५ हेक्टरवर खरीप

sakal_logo
By

22961
आजरा : रोहिणीचा पेरा साधण्यासाठी आजरा तालुक्यातील शेतकरी मशागतीच्या कामांत व्यस्त आहे. (छायाचित्र : श्रीकांत देसाई)

आजऱ्यात २१ हजार ९८५ हेक्टरवर खरीप
रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकरी सज्ज; मशागतीची कामे सुरू, पेरणीला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ : रोहणीचा पेरा व मोत्याचा तुरा ही म्हण शेतकरी वर्गात प्रसिद्ध आहे. रोहणी नक्षत्रामध्ये पेरणी केल्यास पिकाचे उत्पादन चांगले येते अशी धारणा आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील शेतकरी रोहिणीचा पेरा साधण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुक्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून २१ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार आहे. यामध्ये ९ हजार ७०० हेक्टरवर भात पिकाची लागवड होईल. या दोन चार दिवसांत पेरणीला सुरुवात होणार आहे.
यंदा मृग नक्षत्राला लवकरच सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. भाताच्या देशीवाणासह सुधारित, संशोधीत व संकरित जातीच्या वाणाची लागवड केली जाणार आहे. घनसाळ, काळाजीरगा या भाताच्या देशीवाणासह भोगावती, इंद्रायणी, आर-१, कोईमतूर ५१, एम १२५, शुभांगी, चिंटू, फुलेसमृध्दी, दप्तरी, तृप्ती, सोनम यासह विविध संकरीत व सुधारीत जातीची बी-बियाण्यांचा लागवडवडीमध्ये समावेश आहे.
खरीपची लागवड होणारी पिकांचे नाव व हेक्टरी क्षेत्र; तृणधान्य - १३२५० हे. यामध्ये भात - ९७०० , नागली- ३५००, खरीप ज्वारी -५०, काही प्रमाणात बाजरी, मका, वरी याची पेरणी होईल. कडधान्याची - २० हे. यामध्ये तूर, मूग, उडीद, चवळी, श्रावण घेवडा, पावटा, कुळथ या पिकांचा समावेश आहे. तेलबियांची लागवड -४०५५ यामध्ये भुईमूग- ३२५०, सोयाबीन ८००, तीळ, कारळा, सूर्यफुल, अन्य तेलबियांची लागवड होईल. उसाचे लागवड क्षेत्र - ४५७८. त्याचबरोबर मीरची, भाजीपाला, चारा पिक, केळी याची लागवड होणार आहे.
-----------------
चौकट
घनसाळ १२० हेक्टरवर
आजरा घनसाळ या पिकाची यंदा १२० हेक्टरवर लागवड होईल. यंदा आजरा घनसाळ या भाताची उचल वेळेत न झाल्याने काही शेतकऱ्यांकडे हा भात पडून आहे. त्याची विक्री वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. पण या भाताची होणारी मागणी लक्षात घेता. यंदाही लागवडीचे क्षेत्र कायम असल्याचे तालुका कृषी विभागातर्फे सांगितले.
-------------
धूळवाफ पेरणी, भात टोकणीला वेग
तालुक्यात पूर्वभागात भाताच्या धूळवाफ पेरणीसह टोकणीला सुरुवात झाली आहे. खोराटवाडी, जाधेवाडी, मासेवाडीसह मडिलगे परिसरात पेरणीची कामे सुरू आहेत. अजून पश्चिम भागात तरवे टाकणीची कामे सुरू झालेली नाहीत. तरवे जाळण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात धूळवाफ व टोकणीचे क्षेत्र साठ टक्के असून रोप लावणीचे क्षेत्र चाळीस टक्के इतके आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59360 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top