कुमार विद्यामंदिरमधील भोसले दांपत्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुमार विद्यामंदिरमधील भोसले दांपत्यांचा सन्मान
कुमार विद्यामंदिरमधील भोसले दांपत्यांचा सन्मान

कुमार विद्यामंदिरमधील भोसले दांपत्यांचा सन्मान

sakal_logo
By

22708
-----------
कुमार विद्या मंदिरमधील
भोसले दाम्पत्याचा सन्मान
दानोळी, ता. १८ ः येथील कुमार विद्या मंदिर शाळा क्रमांक दोनमधील शिक्षक विजय भोसले व शिक्षिका सौ. स्वाती भोसले यांचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत सन्मान केला. पंढरपूर येथे झालेल्या राज्य कृतीशील शिक्षक महाराष्ट्र संमेलनमध्ये राज्य शिक्षण संचालक दिनकर टेमकर व उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांच्या हस्ते सन्मान झाला.
भोसले दाम्पत्याने कोरोनामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘शिकू आनंदे’ कार्यक्रमअंतर्गत १९ फेब्रुवारीला शिवजन्मकाळ सादरीकरण केले होते. हे राज्यभर प्रसारित केले होते. यामध्ये ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. असा ऐतिहासिक कार्यक्रम घेतल्याबद्दल शाळेचे, विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका, पालक यांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अरविंद मजलेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय वाळकुंजे आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59384 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top