दुकानगाळे भाडेवाढीचे फेरनिर्धारण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकानगाळे भाडेवाढीचे फेरनिर्धारण होणार
दुकानगाळे भाडेवाढीचे फेरनिर्धारण होणार

दुकानगाळे भाडेवाढीचे फेरनिर्धारण होणार

sakal_logo
By

22735

दुकानगाळे भाडेवाढीचे फेरनिर्धारण होणार
मुंबईतील बैठकीत महत्त्‍वपूर्ण निर्णय; राज्यमंत्री तनपूरे यांची उपस्थिती

इचलकरंजी, ता. १८ : येथील पालिकेच्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीच्या प्रश्नाचा गुंता निर्माण झाला होता. मात्र आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्‍वपूर्ण निर्णय झाला. २०१७ मध्ये त्रिसदस्यीय समितीने केलेल्या भाडेवाढीचे फेरनिर्धारण करण्याचे आदेश श्री. तनपुरे यांनी दिले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांचा पाठपुरावा महत्त्‍वाचा ठरला. या निर्णयामुळे भाडेवाढीची पडताळणी केली जाणार आहे. परिणामी, भाडेवाढीमध्ये कपात होण्याची आशा निर्माण झाली आहे.
शहरातील विविध भागात पालिकेच्या मालकीची ७२६ दुकान गाळे आहेत. २०१७ मध्ये या दुकानगाळ्यांची त्रिसदस्याय समितीने भाडेवाढ व अनामत वाढ सुचवली. ती पाच ते आठ पट वाढवली. त्यामुळे गाळेधारक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. दुसरीकडे पालिकेने सुधारित दराप्रमाणे भाडेवाढ न भरल्यास तीन वर्षांनंतर दुकान गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली.
याबाबत दुकानगाळेधारकांनी पालिकेसमोर आंदोलन केल्यानंतर पेच निर्माण झाला. याबाबत श्री. कारंडे यांनी मध्यस्थी आज राज्यमंत्री तनपूरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्रिस्तरीय समितीने केलेली भाडेवाढ ही कशी अव्यवहार्य आहे. याबाबत श्री. कारंडे यांच्यासह गाळेधारक कृती समितीने पटवून दिले. भरमसाट वाढ केल्यामुळे ही भाडेवाढ कोणालाच परवडणार नाही, असे सांगितले. २०१७ च्या सुधारित भाडेवाढीची पडताळणी करावी व योग्य भाडेवाढ करावी, अशी मागणी केली.
मंत्री तनपूरे यांनी सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर त्रिसदस्यीय समितीने सुचवलेल्या सुधारित दरवाढीचे तातडीने फेर निर्धारण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. यामुळे याप्रश्नी दुकान गाळेधारकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. भाडेवाढीचा फेरआढावा घेतला जाणार असून सुधारित भाडेवाढीमध्ये कपात होण्यास मदत होईल, असे श्री. कारंडे यांनी बैठकीनंतर सांगीतले.
बैठकीस मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, मिळकत व्यवस्थापक सचीन पाटील, श्रीकांत पाटील, नगर विकास विभागाचे अधिकारी मोघे, दुकान गाळेधारक कृती समितीचे प्रताप होगाडे, माजी आमदार राजीव आवळे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, गाळेधारक जोतीराम साळुंखे, रणजित आबाळे, स्वरूप कुडाळकर, ओमप्रकाश धूत, श्रीकांत कलाल, अमित बीयाणी, विकी काबरा उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59425 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top