भाजप आंदोलन टीपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप आंदोलन टीपी
भाजप आंदोलन टीपी

भाजप आंदोलन टीपी

sakal_logo
By

22587

नगररचनासमोर भाजप- ताराराणीचा ठिय्या
राजारामपुरीत अतिक्रमण हटावच्या नावाखाली मनमानी केली जात असल्याचा निषेध

कोल्हापूर, ता. १८ ः राजारामपुरीत अतिक्रमण हटावच्या नावाखाली मनमानी केली जात असल्याचा निषेध करून स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी भाजप व ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली‌ नगररचना विभागासमोर ठिय्या आंदोलन केले. आडव्या गल्लीमध्ये कारवाई करायची नाही असे ठरलेले असताना तिथेही मार्किंग करून नागरिकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचाही आरोप केला.
दरम्यान, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत गुरूवारी (ता. १९) दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत निर्णय होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांनी कारवाई करू नये अन्यथा विरोध करण्याचा इशारा यावेळी दिला.
सकाळी साडेअकराच्या सुमारास माजी नगरसेवक व नागरिक नगररचना विभागाच्या कार्यालयात गेले. एकही अधिकारी हजर नव्हता. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनी चर्चा करण्यासाठी सकाळी अकराची वेळ नागरिकांना दिली होती; पण त्यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे दवाखान्यात ॲडमीट असल्याचा मोबाईलवर मेसेज केल्याचे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सांगितले. यानंतर सर्वांनी प्रशासनाचा निषेध केला व कार्यालयाबाहेर येऊन ठिय्या आंदोलन केले.
यावेळी ॲड. बाबा इंदूलकर यांनी मनमानीविरोधातील ही लढाई न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले. बड्यांना संरक्षण आणि सामान्यांना त्रास असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही दिला. माजी नगरसेवक कदम यांनी तोंडे बघून कारवाई केली असून, नगररचनाचे पार्किंग नसल्याने हे कार्यालय बंद करण्याची मागणी केली. पडद्यामागील सूत्रधाराची दादागिरी सुरू असल्याचाही आरोप केला.
माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, अजित ठाणेकर, संग्राम निंबाळकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे, किरण नकाते, बाबा पार्टे, विजय जाधव, रहीम सनदी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59453 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top