कसबा बावडा लेझिम स्पर्धा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा लेझिम स्पर्धा निकाल
कसबा बावडा लेझिम स्पर्धा निकाल

कसबा बावडा लेझिम स्पर्धा निकाल

sakal_logo
By

22757

ज्योतिर्लिंग, हनुमान पथकास
लेझीम स्पर्धेत प्रथम क्रमांक

कोल्हापूर, ता. १८ ः कसबा बावडा येथील छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटीच्यावतीने आयोजित लेझीम स्पर्धेत मुगडेवाडीच्या ज्योतिर्लिंग लेझीम पथकाने, तर मुलींच्या गटात शिरगांवमधील हनुमान लेझीम पथकाने पहिला क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत गवशीच्या भैरवनाथ लेझीम पथक व मांडुकलीतील कानोबा लेझीम पथकाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत मुलींच्या गटात बोरगावच्या विठ्ठल लेझीम पथकाने दुसरा क्रमांक मिळवला. विजेत्यांना राष्ट्रपती पदक विजेते दत्तात्रय मासाळ यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. दरम्यान, कसबा बावड्यातील आयुष शिंदे या दहा वर्षाच्या मुलाने शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगणारे व्याख्यान सादर केले. यावेळी ॲड. नीलेश नरुटे, ॲड. सागर शिंदे, किशोर पाटील, प्रभाकर काशीद, राजेंद्र वाडकर, अशोक पाटील, भाऊसो ठोंबरे, प्रशांत पाटील, शैलेश पाटील, बसवंत पाटील, कौशल बकरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59461 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top