महागाईला राज्य सरकार जबाबदार ः प्रविण दरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईला राज्य सरकार जबाबदार ः प्रविण दरेकर
महागाईला राज्य सरकार जबाबदार ः प्रविण दरेकर

महागाईला राज्य सरकार जबाबदार ः प्रविण दरेकर

sakal_logo
By

दरेकर फोटो

महागाई वाढीला
राज्य सरकार जबाबदार
प्रवीण दरेकर; इंधनावरील कर कमी न केल्याने जीवनावश्यक वस्तू महागल्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः महागाई वाढीला राज्य सरकार जबाबदार आहे, त्यांनी इंधनावरील कर कमी न केल्याने दळणवळण सेवा महागली. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, महागाईला राज्य सरकारच जबदार असून, विनाकारण ते केंद्राकडे बोट दाखवतात. असे स्पष्टीकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एका खासगी लग्न समारंभासाठी दरेकर कोल्हापुरात आले होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महागाईबाबत दरेकरांना विचारले असता ते म्हणाले, ‘महागाईच्या मुद्यावर कायम केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. पेट्रोल आणि डिझेलमधील राज्य सरकारने कर कमी केले, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांत इंधनाचे दर कमी आहेत. वस्तूंवरील व्हॅट कमी केला, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होतील. केंद्राने राज्याचे ‘जीसएसटी’चे सर्व पैसे दिले आहेत.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिक्कोडे, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, सचिन तोडकर, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून
ओबीसी आरक्षणाची हत्या
ओबीसी आरक्षणाबाबत दरेकर म्हणाले, ‘मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांना एकच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिला होता. त्यानंतर मध्यप्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण मिळाले. मात्र, महाराष्ट्र सरकारने ते केले नाही. पर्यायाने राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागतील. ओबीसी आरक्षणाची हत्या महाविकास आघाडीने केली आहे. कारण त्यांना धनदांडग्यांना संधी द्यायची आहे.’

कस्तुरी सावेकरचे अभिनंदन
जगातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणाऱ्या कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिचे अभिनंदन प्रवीण दरेकर यांनी केले. तसेच तिला पुढील मोहिमेसाठी जी आर्थिक मदत लागेल ती भारतीय जनता पक्षातर्फे केली जाईल, असे आश्वासनही दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59464 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top