संभाजीराजेंची महाविकास आघाडीकडून फसवणूक ः दरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजेंची महाविकास आघाडीकडून फसवणूक ः दरेकर
संभाजीराजेंची महाविकास आघाडीकडून फसवणूक ः दरेकर

संभाजीराजेंची महाविकास आघाडीकडून फसवणूक ः दरेकर

sakal_logo
By

प्रविण दरेकर

महाविकास आघाडीकडून
संभाजीराजेंची फसवणूक
--
प्रवीण दरेकर; भाजपची याबाबत भूमिका स्पष्ट नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१८ ः छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज असणाऱ्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची फसवणूक महाविकास आघाडीने केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला, पण आता शिवसेना त्यांच्या विरोधात उमेदवार देणार आहे, महाविकास आघाडीने संभाजीराजे यांची फसवणूक केली. भाजपने याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भाजपची चाल आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
श्री. दरेकर म्हणाले, ‘राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. बहुदा त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चाच केली नसावी. कारण शिवसेना संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. यावरून संभाजीराजेंबद्दल शिवसेनेला काय प्रेम आहे, ते दिसून आले. काँग्रेसने संभाजीराजे यांच्या बाबतची भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. यावरून संभाजीराजे यांची फसवणूक महाविकास आघाडीने केल्याचे स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्ष याबाबत भूमिका लवकरच स्पष्ट करेल. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.’
श्री. दरेकर म्हणाले, ‘पोलिसबळाचा गैरपावर करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात दहशत माजवत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने जी पोस्ट केली, ती निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा धिक्कार करतो. कोणत्याही आदरणीय व्यक्तीबद्दल अशा पद्धतीने लिहू नये, मात्र चितळे हिला पोलिसांच्या उपस्थितीत झालेली मारहाण आणि शाई फेकण्याचा प्रकारही निंदनीय आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. किरीट सोमय्या यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली. राज्य सरकार पोलिसीबळाचा गैरवापर करून दहशत माजवण्याचा प्रकार करत आहे.’
--------
रोहित पवारांचा सल्ला नको
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सल्ला देतात. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याएवढे ते मोठे नाहीत. त्यांनी सल्ला देऊ नये, असेही दरेकर म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59483 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top