अंबाबाई मंदिर फरशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिर फरशी
अंबाबाई मंदिर फरशी

अंबाबाई मंदिर फरशी

sakal_logo
By

22717
कोल्हापूर ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फरशी काढल्यानंतर खुले झालेले पायऱ्यांवरील नक्षीकाम.

22714
गरुड मंडप आता असा दिसतो.

अंबाबाई मंदिराचे मूळ रूप
येऊ लागले उजेडात
संगमरवरी फरशी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. भाविकांच्या गर्दीमुळे उर्वरित काम सोमवार (ता.२३) पासून पूर्ण केले जाणार आहे. मंदिरातील गणपती चौक, गरुड मंडपासह पायऱ्यांवरील फरशा काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, फरशा काढल्यानंतर मंदिराचे मूळ रूप उजेडात येऊ लागले आहे.
पुरातत्त्व खात्याने आठ वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालात देवस्थान समितीला विविध सूचना केल्या होत्या. त्यात दगडी झुंबराच्या ठिकाणी बसवलेले लोखंडी साचे काढून टाकण्याविषयी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानुसार डिसेंबरमध्ये मंदिरातील दगडी कोरीव झुंबराने मोकळा श्वास घेतला आणि प्रदीर्घ काळापासून लोखंडी पाईप्सच्या मागे दडून गेलेले या झुंबराचे सौंदर्य खुले झाले.
एकूणच मंदिराचे मूळ सौंदर्य खुले करण्याच्या उद्देशाने याच दरम्यान प्रक्रिया सुरू झाली आणि हेरिटेज समितीची परवानगी घेऊन संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. कोणत्याही यंत्रांशिवाय केवळ छिन्नी व हातोड्याच्या साहाय्याने काम सुरू असून, लवकरच ते पूर्ण केले जाणार आहे. फरशी काढल्यानंतर काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जाताना अडथळा निर्माण होण्याची किंवा अपघाताची शक्यता असून, योग्य ती खबरदारी देवस्थान समितीने घ्यायला हवी, अशी मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे.

पुढील प्रक्रिया अशी...
देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘मंदिराचे मूळ स्वरूप भाविकांसमोर यावे, याच उद्देशाने ही सर्व कामे सुरू आहेत. फरशी काढल्यानंतरची एकूण परिस्थिती पाहता केवळ वीस टक्के भागात काही किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. तीसुद्धा हेरिटेज नियमानुसारच केली जाईल. भाविकांना दर्शनासाठी येताना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. फरशी काढल्यानंतर स्वच्छतेसाठी अधिक कर्मचारी लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही समितीने आवश्यक ते नियोजन केले आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59531 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top