
अपत्याच्या मुद्यावरुन तक्रार
गवसे सेवा संस्थेच्या
पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
तिसरे अपत्य झाल्याने सदस्यत्व रद्दची मागणी
चंदगड, ता. १९ ः गवसे (ता. चंदगड) येथील पावणाईदेवी सहकारी सेवा संस्थेचे नूतन अध्यक्ष अल्लाबक्ष फक्रू सय्यद व संचालक जयसिंग लक्ष्मण माडेकर यांना शासनाच्या नियमानुसार २००१ नंतर तिसरे अपत्य झाल्याने त्यांचे संचालकपद रद्द करावे, अशी मागणी विरोधी गटाने जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमावेळीच आक्षेप घेतला असताना स्थानिक प्रशासनाने त्यांना पाठीशी घातल्याचा आरोपही केला.
प्रल्हाद कुंदेकर, अनिल पाटील, मोहन पाटील, पांडुरंग नार्वेकर व बाबाजी पाटील यांनी आज येथे पत्रकार परीषद घेऊन या विषयाची माहिती दिली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. येजरे यांना या दोन्ही उमेदवारांच्या तीन अपत्याबाबतची कागदपत्रे सादर केली. खोटी माहिती देऊन पदावर जाणारे पदाधिकारी संस्थेच्या हिताचा कारभार करतील का हा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारांना शासकीय अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने घेऊन आळा घालण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात निवडणुक अधिकारी येजरे, सय्यद व माडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59636 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..