आरटीओ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओ आंदोलन
आरटीओ आंदोलन

आरटीओ आंदोलन

sakal_logo
By

22964

रिक्षा पासिंगची वेळ निश्चित करा
रिक्षा संघटनेची सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा

कोल्हापूर, ता. १९ ः रिक्षा संघटनांना विचारात घेऊन रिक्षा पासिंगची वेळ निश्चित करून चालकांचे हाल थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली. रिक्षासंदर्भात विविध प्रश्नांवर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्याशी चर्चा केली.
रिक्षाचे पासिंग पूर्वी सकाळी केले जात होते. ते दुपारी केले. नंतर पुन्हा सकाळी करण्यात येऊ लागले. कालच रिक्षा संघटनांना विचारात न घेता अचानक दुपारी पासिंग प्रक्रियेस सुरुवात केली. त्यामुळे रिक्षा चालकांचे हाल होत आहेत. याचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. दरम्यान, संघटनांना काही अधिकारी वेळ देत नाहीत व मनमानी करतात, असा आरोप करत शिष्टमंडळाने घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. सुभाष शेटे, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, राजू जाधव, ईश्वर चन्नी, जाफर मुजावर, बाळू सादिगले, विजय ओतारी, आशोक जाधव, जयसिंग सातपुते, अरुण घोरपडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59655 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top