बावडा भंडारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा भंडारा
बावडा भंडारा

बावडा भंडारा

sakal_logo
By

कसबा बावड्यात
आजपासून भंडारा उत्सव
कसबा बावडा, ता. १९ ः येथील बिरदेव देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्री बिरदेव भंडारा उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त उद्यापासून (ता. २०) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टच्या वतीने केले आहे. पालक मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार ऋतुराज पाटील व मान्यवरांचे उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
शुक्रवार (ता.२०) देव माळीतून मंदिरात आणणे, शनिवारी (ता.२१) पहाटे ५.३० वा श्रीस अभ्यंगस्नान व अभिषेक, रात्री १०-१५ वा. परडी पूजन व देव जळास जाणे, रात्री ११ वा भव्य आतषबाजी असा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी (ता.२२) सकाळी ६ वा बल्लादूरी कार्यक्रम व सकाळी ११ वा महाप्रसाद वाटप आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, जुबेर जमादार, दिलीप गुंदेशा यांच्या हस्ते होत आहे. रात्री १० वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होईल. सोमवारी (ता.२३) सकाळी १०.०० वा भंडारा फोडण्याचा कार्यक्रम आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बिरदेव देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष के.डी. हराळे, उपाध्यक्ष आकाश वावरे व सचिव तानाजी लांडगे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59670 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top