अनोखे प्रपोज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनोखे प्रपोज
अनोखे प्रपोज

अनोखे प्रपोज

sakal_logo
By

२३०४०

‘मॅरी मी उत्कर्षा’चा फलक लावून प्रपोज!
कोल्हापूरच्या तरुणाची शक्कल; अनोख्या पद्धतीच्या प्रपोजची सोशल मीडियावर धूम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः लग्नासाठी एखाद्या आवडत्या मुलीला कोण कशा पद्धतीने प्रपोज करेल याचा काही नेम नाही. मध्यंतरी एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या मुलाने मुलीला आयफेल टॉवरवर जाऊन प्रपोज केले होते, त्या दोघांचे लग्नही थाटात झाले. औरंगाबादमध्ये एका पट्ट्याने तर ‘निवडणुकीसाठी बायको हवी’ असा फलकच लावला होता. त्याच पद्धतीने कोल्हापुरातील एका तरुणाने ‘उत्कर्षा मॅरी मी’ अशा आशयाचा फलक महामार्गावर लावून प्रेयसीला प्रपोज करण्याचा नवा फंडा केला आहे. सोशल मीडियावर दिवसभर या फलकाचीच चर्चा रंगली आहे.
कोल्हापुरातील सौरभ कसबेवकर व सांगलीतील उत्कर्षा हे दोघे सांगली येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात. २०१७ पासून ते एकाच वर्गात आहेत; पण त्यांची फारशी ओळख नाही. अलीकडेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सौरभच्या घरच्यांनी लग्नासाठी त्याच्याकडे विचारणा करून तुझ्या मनात कोण मुलगी असेल तर सांग तिच्या घरच्यांशी चर्चा करू असे सांगितले. त्यावर या पठ्ठ्याने वर्गातील उत्कर्षा ही मुलगी आपल्याला आवडत होती असे सांगितले.
सौरभच्या कुटुंबीयांनी उत्कर्षाच्या घरी जाऊन तिला रितसर मागणी घातली. उत्कर्षाच्या घरच्या लोकांकडून होय नाही सुरू होते. उत्कर्षाचाही होकार नव्हता. अनेक प्रयत्नानंतर उत्कर्षाच्या घरचे तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले. त्यानुसार त्याने कोल्हापूर-सांगली रस्त्यावर ५० बाय २५ च्या मोठ्या फलकावर ‘उत्कर्षा मॅरी मी’ असा आशय लिहून त्याखाली स्वतःचे नांव लिहिले. दोन दिवसांपासून या फलकाचीच चर्चा कोल्हापुरात होती. आज उत्कर्षाने त्याला होकार कळवल्यानंतर फलकासमोरच दोघांनी एकमेकाला पुष्पगुच्छ देत लग्नाला होकार दिला.
मुलाने आपल्याला अशा पद्धतीने प्रपोज करावे की या आधी तसे कोणी केले नसेल अशी इच्छा अनेक मुलींची असते. त्यातून अनोख्या पद्धतीने केलेले प्रपोज हे लक्षात राहते. सौरभने नेमकी हीच संधी साधून लावलेला फलक आणि त्यावरील मजकूर मात्र चर्चेचा विषय ठरला.

२७ मे रोजी विवाह
या फलकाच्या चर्चेनंतर दोघांच्या घरातील लोकही तयार झाले. आता उत्सुकता लग्नाची होती. त्याचीही तारीख ठरली असून २७ मे रोजी या दोघांचा विवाह सोहळा कोल्हापुरात होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59732 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top