लक्षतीर्थ हल्ला आणखी तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्षतीर्थ हल्ला आणखी तिघांना अटक
लक्षतीर्थ हल्ला आणखी तिघांना अटक

लक्षतीर्थ हल्ला आणखी तिघांना अटक

sakal_logo
By

वैरागवाडीतील क्रशर मशीन
बंद करण्याची प्रांतांकडे मागणी
गडहिंग्लज : वैरागवाडी (ता. गडहिंग्लज) येथे दोन खडी क्रशर मशिनमुळे नागरिकांना त्रास होत असून त्या बंद कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, गावालगतच क्रशर मशीन सुरू आहेत. उत्खननामुले घरांना तडे जाणे, धुळीमुळे चारा, बोअरिंग व पिकाचे नुकसान होत आहे. वारंवार क्रशर मालकांना भेटून मशिन बंद करण्याची मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे तत्काळ प्रशासनाने हे क्रशर बंद करावेत अशी मागणी आहे. निवेदनावर प्रकाश रेडेकर, विजय खवरे, उदय सोमशेट्टी, संदीप पाटील, भैरीनाथ मांडेकर, सुनील पाटील, सचिन पाटील, धोंडीबा मांडेकर, मनोहर पाटील, पंडित पाटील, मारुती पाटील, भाऊसाहेब पाटील, अरुण पाटील आदींच्या सह्या आहेत.

राडा प्रकरणी आणखी तिघांना अटक
कोल्हापूर ः लक्षतीर्थ वसाहत येथील प्राणघातक हल्ला प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. तानाजी राहुल शेळके, बाळू ऊर्फ बाबूराव सखाराम गावडे आणि रामचंद्र बाबूराव आडुळकर (बोंद्रेनगर) अशी संशयितांची नावे आहेत. तिघांना न्यायालयाने २३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे उपनिरीक्षक इक्बाल महात यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, वर्चस्व व पोस्टर लावण्यावरून लक्षतीर्थ वसाहतीत सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात संशयित विजय ऊर्फ रिंकू देसाईसह साथिदारांवर गुन्हा दाखल केला. होता. दरम्यान याप्रकरणी काल ११ संशयितांना अटक केली. देसाईचा शोध सुरू असल्याचे महात यांनी सांगितले.

चाकू हल्ला प्रकरणी पोलिस कोठडी
कुरुंदवाड ः ताटात रस्सा सांडल्याच्या कारणातून वाद होऊन दोघांवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (दोघे कुरुंदवाड) कुलदीप संकपाळ (शेडशाळ, ता. शिरोळ) यांना येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी कवठेगुलंद येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित शिकलगार व संकपाळ हे तिघे व जखमी ओंकार माने व अमीनमहंमद पटेल जेवत असताना एकमेकांचा धक्का लागल्याने बाचाबाची होऊन शिवीगाळ व हाणामारीत रूपांतर झाले. माने व पटेल याच्यावर संशयित आरोपींनी चाकूने वार करून जखमी केले होते. संशयितांना आज न्यायालयात उभे केले होते.

वाहनचालकांवर कारवाई
शाहूनगर ः शाहूवाडी येथील निर्भया पथकाने आज कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर कौलव येथे बेकायदेशीररित्या वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. वाहन चालवण्याचा परवाना नसणे, तिब्बल सीट वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपअधीक्षक मलगुंडे, पोलिस नाईक स्वाती जुगन, कॉन्स्टेबल सारिका आमते, प्रवीण कानुगडे, आयुब मुल्लानी, अर्जुन बादरे यांनी ही कारवाई केली.

कोडोलीत संशयितांची धरपकड
कोडोली ः येथे मिरवणूक बंद करण्यावरून झालेल्या वादवादातून दोन गटात झालेल्या मारामारीत गुन्हा नोंद झालेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. १५) सी.के. तालीम मंडळांने मिरवणूक काढली होती. मिरवणूक किबिले गल्ली जवळ आली असता दोन गटात वाद होऊन मारामारी झाली होती. परस्परविरोधी फिर्यादीवरून ५४ जणांवर गुन्हा नोंद झाला होता. सर्वांना आज पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. त्यांना उद्या (ता. २०) पन्हाळा सत्र न्यायालयात हजर करणार असल्याचे कोडोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी सांगितले.

कोगिल खुर्दच्या एकास अटक
उजळाईवाडी ः कोगील (ता. करवीर) येथील विवाहितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार करणाऱ्या सुखदेव दादू कांबळे (कोगील खुर्द, ता. करवीर) यास अटक केली. पीडित महिलेवर १० डिसेंबर २१ ते १३ फेब्रुवारी २२ या कालावधीत वेळोवेळी पीडितेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित गर्भवती राहिली. याबाबत कोठेही वाच्यता केल्यास संशयिताने स्वतः आत्महत्या करण्याची व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पीडितेने पतीस सांगितल्यानंतर पीडितेने आरोपी विरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित कांबळे यास अटक केली असून तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणाली पवार करीत आहेत.

01932
गडमुडशिंगीतून तरुण बेपत्ता
गांधीनगर : कामावर जातो असे सांगून शरद आनंदा वायदंडे (वय २९, रा. गडमुडशिंगी ता. करवीर) हा ११ एप्रिलपासून बेपत्ता आहे. याबाबतची फिर्याद भाऊ राहुल आनंदा वायदंडे यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली. शरद वायदंडे बालिंगा (ता. करवीर) येथे कामावर जातो म्हणून गेला होता. पण कामावर न जाता तो बेपत्ता झाल्याची फिर्याद भाऊ राहुल यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली आहे.

दाभिलवाडीतून काजू बीची चोरी
आजरा ः दाभीलवाडी (ता. आजरा) येथील शेतातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी काजू बीची पाच पोती पळवली. याची तीस हजार किंमत आहे. नंदकुमार आनंदा वाजे यांनी फिर्याद दिली. आजरा पोलिसांत चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. वाजे यांनी शेतातील घरात काजू बीची पोती भरून ठेवली होती. यांचे वजन प्रत्येकी पन्नास किलो आहे. काल बुधवार (ता. १८) रात्री साडेसातनंतर चोरट्याने पोती पळवल्याचे फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. नाईक संतोष घस्ती तपास करीत आहेत.

सांगवडेवाडीच्या संशयितास कोठडी
जयसिंगपूर : आई व वडिलांना मारहाण करण्याची धमकी देऊन लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिल बाळू वडर (सांगवडेवाडी, ता. करवीर जि. कोल्हापूर) याच्या विरोधात पीडित युवतीने जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली होती. जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी वडर याला ताब्यात घेऊन येथील येथील प्रथमवर्ग न्यालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून सुर्यकांत मिरजे यांनी युक्तीवाद केला.

दानोळीत दोघांना मारहाण
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथे घराच्या कारणातून मारहाणीत दोघे जखमी झाले. स्वप्नील जयकुमार नाईक (वय ३३) व जयकुमार श्रीधर नाईक (जयसिंगपूर) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. हाणामारी प्रकरणातील रुपेश भीमराव नाईक, अभय बंडू माने, आदित्य संजय धनवडे सर्व (दानोळी) यांच्या विरोधात जखमी स्वप्नील नाईक यांनी जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहे.

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
जयसिंगपूर ः शहरातील झाशी चौकात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत अब्बास इजाज ईराणी, अब्बास मुनिर ईराणी दोघे जखमी झाले. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घटना घडली. रसमारी सरताज ईराणी, टिल्या बागवान, निहाल बागवान, वैभव पाटील (जयसिंगपूर) यांच्या विरोधात जखमी अब्बास ईराणी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनपाडळे येथून बोकड चोरीस
घुणकी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथून बोकड चोरीला गेल्याची तक्रार रुक्मिणी कुरणे यांनी पेठवडगाव पोलिसांत दिली आहे.
रुक्मिणी कुरणे यांच्या मालकीचा वीस हजारांचा बोकड रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शेडचे कुलूप तोडून चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. दरम्यान संशयित म्हणून आरळेतील एकाला पेठवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.