
केएमटी
23043
केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकीत
वेतनातील ३० लाख वितरीत
राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार निर्णय
कोल्हापूर, ता. १९ ः महापालिका प्रशासनाकडून केएमटीच्या ८०० कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली. अतिरिक्त व्यवस्थापक पदावर अधिकारी नियुक्त केला. थकीत वेतनासाठी ३० लाखांची रक्कम वितरीत केली. रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला असून केएमटीला उर्जितावस्था देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज सांगितले. क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे मान्य झालेल्या मागण्यांमुळे केएमटी कर्मचारी संघटनेने त्यांचा सत्कार केला.
कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी महापालिकेसमोर उपोषण केले होते. यावेळी क्षीरसागर यांनी मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. क्षीरसागर यांच्या प्रशासकांसमवेत बैठका झाल्या. यात मनपा स्तरावरील प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार यापूर्वीच के.एम.टी.च्या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांना महागाई भत्तापोटी वेतनवाढ दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधी ठराव केला असून, आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळताच तो कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. तसेच कर्मचाऱ्याची रखडलेली पदोन्नती प्रक्रिया मार्गस्थ झाली असून, आवश्यक रोस्टर तपासणी सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले. मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, उपाध्यक्ष विश्वनाथ चौगले, जनरल सेक्रेटरी आनंदा आडके, खजानिस अंकुश कांबळे, जितेंद्र संकपाळ, अभिजित रणनवरे, अश्विन चौगले, सागर वैराट, किरण सावर्डेकर, राजेश ठोंबरे, संभा निकम, दिलीप सुतार, रमेश चौगले आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59755 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..