शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मेपर्यंत भरावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मेपर्यंत भरावेत
शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मेपर्यंत भरावेत

शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मेपर्यंत भरावेत

sakal_logo
By

३१ मेपर्यंत शिष्यवृत्तीचे
अर्ज भरण्याचे आवाहन

कोल्हापूर, ता.1९ : शैक्षणिक वर्ष सन 2021-22 करीता महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज महाडिबीटी पोर्टलवर 31 मे पर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष व सहाय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाची मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ.११वी व १२वी) व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना महाडिबीटी या पोर्टलव्दारे ऑनलाईन केल्या आहेत.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण वाढण्याकरीता प्रयत्न कारावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयातील प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याचा अर्ज भरला गेला आहे का याची खात्री करावी. त्यांच्या स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करून लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59785 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top