Sat, April 1, 2023

कंत्राटी भरतीसाठी सैनिक कल्याण
कंत्राटी भरतीसाठी सैनिक कल्याण
Published on : 19 May 2022, 3:15 am
कंत्राटी भरतीसाठी सैनिक कल्याणचे आवाहन
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अखत्यारीत सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर व माजी सैनिक विश्रामगृह, कोल्हापूरकरिता अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी त्यांचे अर्ज ५ जूनपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे चौकीदार-१, मानधन ८ हजार ९११ रुपये, तर माजी सैनिक विश्रामगृह (कोल्हापूर) येथे सफाईकामगार मानधन ५ हजार ६५८ रुपये इतके राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधावा.