एन.डी.पाटील यांचे स्मारक शाहू कॉलेजमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एन.डी.पाटील यांचे स्मारक शाहू कॉलेजमध्ये
एन.डी.पाटील यांचे स्मारक शाहू कॉलेजमध्ये

एन.डी.पाटील यांचे स्मारक शाहू कॉलेजमध्ये

sakal_logo
By

23096

डॉ. एन. डी. पाटील यांचे
शाहू कॉलेजमध्ये स्मारक
प्रभारी प्राचार्य किल्लेदार; ३.७५ कोटींची तरतूद; डिसेंबरअखेर उभारणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे स्मारक आणि एन. डी. पाटील भवन शाहू महाविद्यालयात उभारले जाणार आहे. यासाठी ३ कोटी ७५ लाखांची तरतूद केली असून डिसेंबरअखेर याचे काम पूर्ण होईल. ही माहिती शाहू महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
किल्लेदार म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत महाविद्यालयाने विविध शैक्षणिक प्रगतीचे टप्पे पार केले. आता महाविद्यालयाच्या परिसरात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे स्मारक आणि त्यांच्या नावाने भवन उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये त्यांची ग्रंथसंपदा, त्यांना मिळालेल्या वस्तू, त्यांच्या सामाजिक जीवनाची माहिती देणारी प्रदर्शनी अशा गोष्टी असतील. एन. डी. पाटील भवन येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी ७५ लाख इतका खर्च येणार असून याची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन असून लवकरच कामाला सुरुवात होईल. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी पाच मजली इमारत उभारली जाणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना येथे सीबीएसई बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकता यावे यासाठी शाळाही सुरू करण्यात येणार आहे.’’
पत्रकार परिषदेला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. बी. शेख, उपाध्यक्ष प्रा. एम. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, प्रा. डॉ. सिंधु आवळे उपस्थित होते.

माजी विद्यार्थी मेळावा रविवारी
शाहू महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (ता. २२) होणार आहे. मेळाव्याला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून माजी विद्यार्थी येणार आहेत. दलित मित्र व्यंकाप्पा भोसले, ‘उपरा’कार लक्ष्मणराव माने, प्राचार्य टी. एस. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, असे शेख यांनी सांगितले. सकाळी १० वाजता कॉलेजमध्ये मेळावा घेतला जाणार आहे.