जयप्रभा स्टुडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयप्रभा स्टुडिओ
जयप्रभा स्टुडिओ

जयप्रभा स्टुडिओ

sakal_logo
By

संकष्टी फोटो- २३०७८


२३०८१
‘जयप्रभा‘ प्रश्नी आत्मदहनाचा इशारा
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी कायमस्वरुपी खुला व्हावा, या मागणीसाठी आज कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी चौकात मानवी साखळी झाली. जयप्रभा स्टुडिओच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द व्हावा, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध व्हावा, अशी मागणी या वेळी झाली. सात दिवसांच्या आत शासनाला जाग आली नाही तर सामूहिक आत्मदहन करणेचा इशारा दिला असल्याचे चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले. हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्‍ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, मोहन पाटील, अरुण भोसले, सिद्धार्थ लाटकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता बिंदू चौकात मानवी साखळी होणार आहे.

संदीप माळवी यांची उद्या प्रकट मुलाखत
कोल्हापूर : सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेले पन्हाळा तालुक्यातील वाळोली गावचे संदीप माळवी यांची ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपती नियुक्ती झाली आहे. अमृतवेल फाउंडेशनच्या तपपूर्तीनिमित्त शनिवारी (ता.२१) त्यांची प्रकट मुलाखत व नागरी सत्कार होणार आहे. शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
...........
‘अडलंय का?’ नाटकाचा २९ ला प्रयोग
कोल्हापूर ः नाटक कंपनी निर्मित ‘अडलंय का? या बहुचर्चित नाटकाचा प्रयोग २९ मेला येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. सायंकाळी साडेचारला हा प्रयोग होईल. पर्ण पेठे आणि अतुल पेठे यांच्या अभिनयाची जुगलबंदी यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. २८ मेला सांगलीतील भावे नाट्यमंदिरात रात्री साडेनऊला प्रयोग होईल. चार्ल्स लेविन्सिकी यांच्या नाटकाचे शौनक चांदोरकर यांनी भाषांतर केले असून निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन आहे.