
शिवशाही फाउंडेशन
L23085
शिवशाही फाउंडेशनचे
एकदिवसीय धरणे
सर्व रस्ते पक्के करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. १९ ः कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत शिवशाही फाउंडेशनतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करून सह्यांची मोहीम राबविली. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि पर्यटक तसेच कोल्हापूरवासीयांना शहराला कोल्हापूर म्हणायचे की खड्डेपूर असा प्रश्न पडला आहे.
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी फक्त पॅचवर्क करून जनतेच्या तोंडाला पाने पुसत आहेत. यात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याने पॅचवर्क नको, पक्के आणि दर्जेदार रस्ते हवेत या मागणीसाठी गुरुवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविली. या आंदोलनास नागरिकांनी पाठिंबा दिला. उषा शिंदे, अर्चना पाटील, रदीफा नदाफ, सुनील शिंदे, अनिकेत बिरडे, शुभम तुपारे, संजय चव्हाण, शेखर धोंगडे, राहुल नाईक आदींनी परिश्रम घेतले.