टुडे ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४
टुडे ४

टुडे ४

sakal_logo
By

वाड्:मय मंडळ सृजन मंडळ
व्हावेः डॉ. हिमांशू स्मार्त

कोल्हापूर, ता. १९ : आपल्या सभोवतालचे मनोरंजनाचे, कलाव्यवहाराचे , वाड्मयाचे क्षेत्र बदलत जात आहे. प्राचीन इतिहास असणाऱ्या, वाड्:मयच्या चर्चा करणाऱ्या वाड्:मय मंडळानी या काळात अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या क्षमतांचे प्रयोग करुन सृजन मंडळे व्हायला पाहिजे, असे मत नाटककार डॉ .हिमांशू स्मार्त यांनी व्यक्त केले. महावीर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वाड्:मय मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.लोखंडे होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. गोपाळ गावडे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. लोखंडे म्हणाले, की आशयाला अधिक समृद्ध करण्याचे काम रचनाकौशल्याने होते. विद्यार्थांनी व्यक्त होणे आवश्यक आहे. लेखनाचे विविध प्रयोग केल्याने भाषेतील बारकावे ध्यानात येतात.
वाड्:मय मंडळातील सर्व सदस्यांचा सत्कार झाला. बीएबीएड विभागप्रमुखपदी डॉ. महादेव शिंदे , तर प्रा. जयवंत दळवी यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या केंद्र संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. शरद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निबंध व काव्य लेखन प्रकारच्या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
स्वागत व प्रास्ताविक स्नेहल तावडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उज्ज्वला ताटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन धनश्री कांबळे, राजवर्धन गुरव यांनी केले. आभार जय बाचनकर यांनी मानले.