ऋतूराज पाटील- सीबीएसई शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतूराज पाटील- सीबीएसई शाळा
ऋतूराज पाटील- सीबीएसई शाळा

ऋतूराज पाटील- सीबीएसई शाळा

sakal_logo
By

23077

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर
‘दक्षिण''मध्ये सीबीएसई शाळा

ऋतुराज पाटील; मुंबई पब्लिक स्कूलला भेट

कोल्हापूर, ता. १९ ः बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या धर्तीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कोल्हापूर महापालिकेच्या मदतीने सीबीएसई शाळा सुरू करणार असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. आमदार जयंत आसगावकर यांच्यासोबत आज त्यांनी दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या या शाळेत डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, सीसीटीव्ही सुविधा ठिकाणी उपलब्ध आहेत. नर्सरी ते सातवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असून, ४८० इतकी विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबर शालेय साहित्यही मोफत दिले जाते. अशाप्रकारच्या अकरा शाळा बृहन्मुंबई महापालिकेने सुरू केल्या आहेत. याच धर्तीवर कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्याने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सीबीएसई पॅटर्न शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पूजा पाटील, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, विस्तार अधिकारी स्नेहलता डुंबरे, शिक्षक शिवाजी बर्डे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59832 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top