व्हाईट आर्मी टीम आसामला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हाईट आर्मी टीम आसामला रवाना
व्हाईट आर्मी टीम आसामला रवाना

व्हाईट आर्मी टीम आसामला रवाना

sakal_logo
By

व्हाईट आर्मीची टीम
आसामकडे रवाना
कोल्हापूर, ता. १९ ः येथील व्हाईट आर्मीची टीम आसाम येथे आलेल्या जलप्रलयात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी आज रवाना झाली. व्हाईट आर्मीच्या रेस्क्यू टीमसोबतच वैद्यकीय टीमही विविध साहित्यासह रवाना झाली आहे.
कोठेही कसल्याही प्रकारची नैसर्गिक अथवा कोणतीही आपत्ती आली तर व्हाईट आर्मी मदतीसाठी धाव घेते. गेल्या दोन दिवसांपासून आसाम येथे जलप्रलयाने थैमान घातले आहे. आसाममधील २४ जिल्हे यामुळे बाधित झाले आहेत. येथे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा संकटात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात देण्यासाठी व्हाईट आर्मीची टीम रवाना झाली असल्याचे व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांगितले.
डॉ. देवेंद्र पवार, सुधीर गोरे, प्रशांत शेंडे, विनायक भाट, केतन म्हात्रे, सौरभ पाटील, शर्वरी रोकडे, सुभान बागवान, शलमोन आवळे, आनंद कोष्टी यांचा टीममध्ये समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59833 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top