तरूणाची नदीत उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरूणाची नदीत उडी
तरूणाची नदीत उडी

तरूणाची नदीत उडी

sakal_logo
By

शिरोली पुलावरून
तरुणाची पंचगंगेत उडी
कोल्हापूर, ता. १९ ः शिरोली पुलावरून पंचगंगा नदी पुलावरून एकाने आज दुपारी उडी घेतली. अशी माहिती अग्निशामक दलाला मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने शोधमोहीम राबविली. पण त्याला यश आले नाही. अंधार पडल्यानंतर ही शोध मोहीम थांबविली.
अग्निशामक दल आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती, एक तरुण तावडे हॉटेल चौक परिसरात दुपारी आला. त्याने आपले वाहन थांबवून फोन केला. त्यानंतर त्याने नदीत उडी घेतल्याची चर्चा सुरू झाली. अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तावडे हॉटेल ते वळिवडे मार्गावर यांत्रिक बोटीसह उपकरणाच्या साहाय्‍याने तरुणाचा शोध सुरू केला. मात्र त्याला यश आले नाही. सायंकाळी ही मोहीम थांबविली. उद्या (ता. २०) सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे अग्निशामक दलाने सांगितले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59838 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top