राजर्षी शाहू महाराज फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू महाराज फुटबॉल
राजर्षी शाहू महाराज फुटबॉल

राजर्षी शाहू महाराज फुटबॉल

sakal_logo
By

फोटो 
२३०९५
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी बालगोपाल आणि बीजीएम यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

शिवाजी तरुण मंडळाची
खंडोबावर टायब्रेकरवर मात
बीजीएमविरुद्ध बालगोपाल तालीम सरस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. १९ : राजर्षी शाहू महाराज फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. शिवाजी तरुण मंडळाने टायब्रेकरवर खंडोबाचा ३-० असा पराभव केला. बालगोपालने बीजीएम स्पोर्टस्‌वर ४-२ असा विजय मिळवला.   
शिवाजी मंडळ आणि खंडोबाच्या सामान्याकडे शौकिनांचे लक्ष लागून राहिले होते. जिंकण्याच्या ईर्षेने मैदानावर उतरलेल्या दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला; परंतु दोन्ही संघांच्या भक्कम बचावफळीमुळे गोल नोंदवणे शक्य झाले नाही. सामना गोल शून्य बरोबरीत संपला. त्यामुळे टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. शिवाजी तरुण मंडळच्या जय कामत, रणवीर जाधव, संकेत साळुंखे यांनी पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये केले. खंडोबाच्या सागर पोवार, दिग्विजय असणेकर, प्रभू पोवार या खेळाडूंनी पेनल्टी स्ट्रोक बाहेर मारल्या. सामना ३ - ० असा गोल फरकाने शिवाजी तरुण मंडळाला विजयी घोषित करण्यात आले. खंडोबाच्या प्रभू पोवार याला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. 
दुसरा सामना बालगोपाल विरुद्ध बीजीएम स्पोर्टस्‌ यांच्यात झाला. हा सामना बालगोपालने चार विरुद्ध दोन गोलनी जिंकला. दोन्ही संघांकडून वेगवान चाली झाल्या. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला बीजीएमच्या वैभव राऊत याने मिळालेल्या संधीचा लाभ घेत पहिला गोल केला; परंतु दोनच मिनिटात बालगोपालच्या रोहित कुरणे याने गोल करत १-१ अशी बरोबरी केली.  
बीजीएमच्या केवल कांबळे याने १८ व्या मिनिटाला संघाच्या दुसऱ्या गोलची नोंद केली. त्यानंतर खेळ पुन्हा गतिमान झाला. २७ व्या मिनिटाला बालगोपालच्या रोहित कुरणे याने वैयक्तिक आणि संघाच्या दुसऱ्या गोलची नोंद केली. मध्यंतरपर्यंत सामना २-२ असा बरोबरीत होता. उत्तरार्धात मात्र बालगोपाल तालीमने अतिशय वेगवान खेळ केला. बीजीएमच्या चाली काहीशा मंदावल्या. याचा फायदा घेत ४९ मिनिटाला बालगोपालच्या ऋतुराज पाटीलने बीजीएमची बचाव फळी भेदत मैदानी गोल केला आणि आघाडी घेतली. यानंतर गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेले बीजीएमचे प्रयत्न अपुरे पडले. आघाडी भक्कम झाल्याने बालगोपालच्या खेळाडूंनी पुन्हा वेगवान खेळ करत ६०व्या मिनिटाला कृणाल नाईक याने चौथा गोल करत संघाची आघाडी ४ -२ अशी निर्णायक केली. बीजीएमच्या सिद्धेश साळोखे याला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. 

आजचे सामने 
 दुपारी २ : दिलबहार विरुद्ध जुना बुधवार  
सायंकाळी ४- प्रॅक्टिस विरुद्ध पीटीएम