बंदूक जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदूक जप्त
बंदूक जप्त

बंदूक जप्त

sakal_logo
By

२३१६५
इनाम सावर्डेत एकाकडून
विनापरवाना बंदूक जप्त
कोल्हापूर ः चंदगड तालुक्यात विनापरवाना बंदूक बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. सागर निंगाप्पा पाटील (वय ३७, इनाम सावर्डे, हिंडगाव, ता. चंदगड) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी बारा बोअरची बंदूक आणि एक जिवंत काडतूस असा एकूण १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही काल सापळा रचून ही कारवाई केली. त्याला चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.

पहार डोक्यात घातल्याने मेंढपाळ गंभीर
घुणकी : हातकणंगले तालुक्यातील पाडळी येथे शेतातील रस्त्यावर बकऱ्यासाठी वागर का बांधतोस असा जाब विचारून सचिन शिवाजी मेथे पाटील (पाडळी) याने मेंढपाळ श्रीपती घाटू माने (वय ६२, मानेवाडी पाडळी) यांच्या डोक्यात लोखंडी पहारीचा घाव घालून गंभीर जखमी केले. या प्रकरणी सचिन मेथे-पाटील याच्यावर वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. जखमी माने स्वतःच्या शेतातील रस्त्यावर बकऱ्यासाठी वागर बांधत होता. दरम्यान, याच रस्त्यावरून सचिन मेथे-पाटील मोटारसायकलवरून वैरण घेऊन जात होता. रस्त्यावर वागर का बांधतोस असे दरडावून माने यांना शिवीगाळ केली. माने यांनी कशाला वाद घालतोस असे विनंती केल्यानंतरही संतापलेल्या सचिनने लोखंडी पहार माने यांच्या डोक्यात घातली. तपास अंमलदार शोभा कुंभार करीत आहेत.

२३३२६
शिप्पूरमध्ये मोटारीच्या धडकेत वृद्ध ठार
गडहिंग्लज : शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथे मोटारीच्या धडकेत एक वृद्ध ठार झाला. रामचंद्र बाळू रायकर (वय ८५) असे मृताचे नाव आहे. आज पहाटे सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, श्री. रायकर हे पहाटे सव्वा सहाच्या सुमारास डेअरीमधून दूध आणण्यासाठी जात होते. तेंव्हा गावातील एसटी थांब्याच्या चौकात मागून येणार्‍या मोटारीने (एमएच ५०, ए-५२५२) त्यांना जोराची धडक दिली. त्यात रायकर यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैदयकीय अधिकार्‍यांनी सांगितले. याप्रकरणी मोटार हयगयीने चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गावातीलच चालक शिवाजी रामंचद्र पाटील याच्याविरुद्ध पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दिनकर रायकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस हवालदार रवी जाधव करीत आहेत.

00927
गव्याच्या हल्ल्यात एक जण जखमी
कडगाव : शेळोली (ता. भुदरगड) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. शिवाजी शंकर सावंत (वय ४५) असे जखमीचे नाव आहे. ते शेतातील जनावरांच्या गोठ्याकडे गेले होते. या वेळी तेथे आलेल्या गव्याने अचानक हल्ला करून जखमी केले. गव्याने पोटात शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुनील देसाई यांनी तात्काळ गारगोटी रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, जीतू भाट यांनी जखमीवर तात्काळ उपचारासाठी सहकार्य केले.

सोनारवाडीत कुत्र्यांकडून बकऱ्यांचा फडशा
चंदगड ः सोनारवाडी (ता. चंदगड) येथील सदाशिव चाळू ठब्बे यांची तीन बकरी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत झाली. आज दुपारी ही दुर्घटना घडली यात ठब्बे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ठब्बे यांनी ही बकरी चरायला सोडली होती. डोंगरात उंचीवर शेत आहे. पावसाने धुके पसरले होते. ठब्बे काजू वेचत असताना बागीलगे, जट्टेवाडी, डुक्करवाडी परिसरातील पाच-सहा भटक्या कुत्र्यांनी चरत असलेल्या बक-यांवर हल्ला केला. यात तीन बकरी मृत झाली. या संदर्भात पंचनाम्यासाठी तलाठ्याची संपर्क साधला असता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांना नुकसानभरपाई देली जात नसल्याचे सांगण्यात आले. परिस्थितीने गरीब असलेल्या आणि मजुरी करणाऱ्या ठब्बे यांना या घटनेने धक्का बसला आहे.

बालविवाहप्रकरणी सात जणांवर गुन्हा
इचलकरंजी : येथील अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नवरदेवासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नवरदेव, मुलाचे वडील, आई मुलीची आजी, आई, भाऊ आणि भटजी यांचा समावेश आहे. याप्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील संभाजी चौक परिसरातील पंत मंदिरात १५ मे रोजी अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. मात्र साखरपुडा असल्याचे सांगण्यात आले. मुलीकडे चौकशी केली असता तिचा विवाह झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बालविकास विभागाने याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बालविवाह अधिनियम कायद्याअंतर्गत सातजणांच्या विरोधात गुन्हा आज दाखल केला आहे.

इचलकरंजीत बालकांवर कुत्र्यांचा हल्ला
इचलकरंजी : शहरातील वेगवेगळ्या भागातील दोन बालकांना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना
शुक्रवारी घडली. जखमी बालकांची नावे श्रीवर्धन यादव (वय ७, विवेकानंद कॉलनी) आणि वेदांत मायकर (वय ५, इचलकरंजी, इंड्रस्टीयल इस्टेट) असून त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामुळे शहरातील भटक्या कुत्रांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बांदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

भिंत पाडल्याने दानोळीत वृद्धास हाणामारी
जयसिंगपूर : सामाईक भिंत पाडल्याच्या रागातून दानोळी (ता. शिरोळ) येथे झालेल्या हाणामारीत रमेश श्रीधर नाईक (वय ६२ रा. अंबाबाई मंदिरजवळ दानोळी ता. शिरोळ) जखमी झाले. ही घटना बुधवारी घडली. हाणामारीप्रकरणी स्वप्नील जयकुमार नाईक व जयकुमार श्रीधर नाईक दोघे (दानोळी) यांच्या विरोधात जखमी रमेश नाईक यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. रमेश नाईक व स्वप्नील नाईक यांच्या घराची सामाईक भिंत आहे. भिंत परवानगीशिवाय का पडली असे रमेश नाईक यांनी स्वप्नील नाईक याला विचारले असता त्याचा राग मनात धरून मारहाण केल्याची फिर्याद रमेश नाईक यांनी दिली.

यंत्रमागधारकाला वीज चोरीची नोटीस
इचलकरंजी : येथील एका यंत्रमागधारकाला वीज चोरी केल्याप्रकरणी महावीतरणने नोटीस बजावली आहे. सलमान चिंचले असे त्याचे नाव आहे. चिंचले याने विद्युत मीटरमध्ये फेरफार करून ३५ हजार ९८४ युनिटची चोरी केल्याचे महावितरणच्या कोल्हापूर भरारी पथकाने उघडकीस आणले आहे. चोरीची ९लाख ७२ हजार २७६ रूपये नोटीस मिळाल्यापासून ४८ तासाच्या भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करून संबधीत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा नोटिसेद्वारे सूचित केले आहे.

रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
कोल्हापूर ः रुकडी (ता. हातकणंगले) गावाजवळ काल रेल्वेतून पडून पुण्यातील एक जण गंभीर जखमी झाला. सीपीआरमध्ये उपचार सुरू असतांना त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. नरसिंगा नाना वाकुसे (वय ५०, रा. पुणे) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर चौकीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59921 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top