पाठ्यपुस्तक पुनर्वापराला हरताळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठ्यपुस्तक पुनर्वापराला हरताळ
पाठ्यपुस्तक पुनर्वापराला हरताळ

पाठ्यपुस्तक पुनर्वापराला हरताळ

sakal_logo
By

घेवू नये
पुनर्वापराच्या धोरणाला वर्षभरातच हरताळ!
शालेय पाठ्यपुस्तक योजना : यंदा विद्यार्थी संख्येइतक्या नव्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : पर्यावरणाचा विचार करून शासनाने गतवर्षी शालेय पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचे धोरण अवलंबले. त्यासाठी ६०-४० असे सूत्र आचरणातही आणले. पर्यावरणीयदृष्ट्या फलदायी ठरलेला हा निर्णय घेणाऱ्या शिक्षण विभाग आणि विशेषत: पर्यावरण विभागाच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते; पण यंदा नव्या शालेय पाठ्यपुस्तकांचा मागणीइतका म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संख्येइतका पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक पुनर्वापराच्या धोरणाला वर्षभरातच हरताळ फासण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना राबविली जाते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडतील, असे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून केले जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी नवी पुस्तके मिळतात. परिणामी, केवळ वर्षभर वापरलेली पुस्तके रद्दीत जात होती. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी कागद लागतो. त्यासाठी वृक्षतोड करावी लागते. त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होते. वर्षातच रद्दीत जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागणार होता.
त्यामुळे शासनातर्फे गतवर्षी पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचे धोरण अवलंबण्यात आले होते. गतवर्षी विद्यार्थ्यांना ६० टक्के नवी पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली; तर उत्तीर्ण होऊन पुढील इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके जमा केली होती. ही जुनी पाठ्यपुस्तके ४० टक्के मुलांना देण्यात आली. या निर्णयाचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यामुळे हेच धोरण दरवर्षी अवलंबले जाईल अशी अपेक्षा होती; पण शासनाने वर्षभरातच पाठ्यपुस्तक पुनर्वापराचे धोरण गुंडाळल्याचे दिसून येत आहे. यंदा ६०-४० सूत्राऐवजी पूर्वीप्रमाणेच विद्यार्थी संख्येइतक्या नव्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करण्यास शिक्षकांना सांगण्यात आले. त्यानुसार शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा केलेली आहेत. असे असतानाही सर्वच विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तके पुरविली जाणार आहेत. त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चौकट...
*
आर्थिकदृष्ट्याही फलदायी होते...
शालेय पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर पर्यावरणासाठी फायदेशीर आहेच. शिवाय तो आर्थिकदृष्ट्याही फलदायी ठरणारा आहे. कारण दरवर्षी नव्याने पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. पुनर्वापर झाल्यास पाठ्यपुस्तके वर्षभरात रद्दीत जाणार नाहीत. साहजिकच नव्याने पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात बचत होते.
---------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59947 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..