गडहिंग्लज पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज पाऊस
गडहिंग्लज पाऊस

गडहिंग्लज पाऊस

sakal_logo
By

23296
गडहिंग्लजला पावसाने
वीट भट्ट्यांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज : शहर आणि तालुक्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने आज दुपारी उसंत घेतली. पंधरा तासांहून अधिक वेळ कोसळलेल्या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. वीट भट्ट्या आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी सोयाबीनची काढणी झाल्याने त्याचे नुकसान टळले आहे.
यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. खरीप पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त होते. काही शिवारात पाणी तुंबल्याने लवकर वाफसा येणे कठीण झाले आहे. यामुळे काही दिवस तरी खरीप पूर्व मशागत कामे खोळंबणार आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात शेतात पाणी साचल्याने त्याचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. यामुळे उत्पादक हैराण झाले आहेत. या पूर्वमौसमी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, धूळवाफ पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला असून वाफसा येताच या पेरण्या गतीने सुरु होणार आहेत.

* सकाळी आठपर्यंत ३४ मिमी. पावसाची नोंद
* पावसाच्या पाण्यात विटांचा चिखल
* ऊस पिकाला पाऊस उपयुक्त
* वाफसानंतर खरीपपूर्व मशागतीला येणार वेग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60056 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top