
माइंडस्केप
‘माईंडस्केप’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन
कोल्हापूर ः स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या ‘माईंडस्केप’ या विषायवरील कलाकृतींचे प्रदर्शन उद्या शनिवारी (ता. २१) सुरू होईल तर रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता ‘माईंडस्केप’ या पुस्तकाचे प्रकाशन व प्रदर्शन होणार आहे. येथील शाहू स्मारक भवनात कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती डॉ. संदीप पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ. भोजराज हे मणक्याच्या विकारावरील तज्ञ आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण व त्यानंतर प्रॅक्टीस सोबत व्यक्तीगत छंद जोपासले आहेत. यात फोटोग्राफी, स्केचिंग, चित्रकला, मिश्र माध्यमाच्या वापरातून त्यांनी सामाजिक आशय मांडणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत. त्या या प्रदर्शनात आहेत.
डॉ. भोजराज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये मणक्याच्या काही गुंगागुंतीच्या शस्त्रक्रियाही यशस्वी केल्या. त्यांनी स्थापन केलेल्या स्पाईन फाऊंडेशनतर्फे डॉ. भोजराज व त्यांच्या पत्नी डॉ. शिल्पा गरजू घटकांतील रूग्णांना ते मार्गदर्शन करतात, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. डॉ. सलीम लाड, डॉ. प्रदीप पाटील, द बॅण्ड बुक कंपनीचे भागीदार ममता देसाई आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60082 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..