स्वच्छतेच्या कामात पालिकेची मोठी बचत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेच्या कामात पालिकेची मोठी बचत
स्वच्छतेच्या कामात पालिकेची मोठी बचत

स्वच्छतेच्या कामात पालिकेची मोठी बचत

sakal_logo
By

स्वच्छतेच्या कामात पालिकेची मोठी बचत
मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल : महिना अखेर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणार

इचलकरंजी, ता. ५ ः शहरातील संपूर्ण स्वच्छतेसाठी पूर्वी वार्षिक २२ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र आता याच कामासाठी वार्षिक १५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यामुळे पालिकेची मोठी आर्थिक बचत होणार आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिली. महिना अखेरीस एकाच विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.
सध्या पालिकेचा प्रशासक पदाचा कार्यभार श्री. ठेंगल यांच्याकडे आहे. तथापि, प्रशासकीय कामकाजाबाबत माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रशासकीय तसेच विकासकामांचा आढावा घेतला.
श्री. ठेंगल म्हणाले, ‘पालिकेत लोकप्रतिनिधी असेपर्यंत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह विविध समित्यांच्या सभापती कामकाज पाहत होते. मात्र आता सर्व विभागातील कामकाजाचा ताण प्रशासकांवर आहे. त्यामुळे कामकाज करताना अनेक अडचणी येत असतात. सुदैवाने राज्य शासनाकडून थकीत सहाय्यक अनुदान ९८ कोटी मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यापैकी सुमारे ५० कोटी रुपये कर्मचाऱ्‍यांना देय असून उर्वरित रकमेतून मक्तेदारांची देणी आणि वीज, पाणी पुरवठा विभागाची थकीत शासकीय देणी भागवली जाणार आहेत. एसटीपीचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी ४६ कोटींची निवीदा काढली आहे. या कामाला लवकरच गती येईल. घनकचरा प्रकल्पात दररोज गोळा होणाऱ्‍या कचऱ्‍यावर प्रक्रिया केली जात असून तेथे ओल्या कचऱ्‍यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती सुरू आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्‍चित झाल्यावर शिक्षकांच्याही बदल्या करणार आहे. नागरिकांच्या हितासाठी शहराचे ४ विभाग केले असून तेथे पालिकेची विभागीय कार्यालय सुरू केली आहेत. तेथील कामकाज गतीने होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्री. ठेंगल यांनी सांगीतले.
------
मुख्याधिकारी म्हणाले....
* आणखी निधी मिळाल्यास कचऱ्याचा प्रश्न मार्गी
* एसटीपीच्या पूर्णत्वानंतर सांडपाणी प्रदूषण बंद होईल
* काळा ओढा स्वच्छता करण्याचे नियोजन सुरू
* पालिकेच्या वास्तू खासगी तत्त्‍वावर चालवण्यास देणार
* ९८ कोटी थकीय सहाय्यक अनुदानाचा योग्य वापर करणार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60109 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top