१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

ओंजळीने पाणी पिणे झाले दुर्मिळ
भारतीय लोकांना ओंजळीने पाणी प्राशन करणे ही सवय नवीन नाही. त्यामुळे ओंजळ म्हणजे दोन्ही हातांची दहा बोटे एकत्र आणून हाताचा द्रोण तयार करणे. जिथे पाणी पिण्यासाठी कोणतेही पात्र उपलब्ध नसते, अशा ठिकाणी नळ, विहीर, हातपंपावर ओंजळीने पाणी पिले जाते. ओंजळीने पाणी पिल्यावर आपली पूर्ण तहान शमत असते. सध्या अशा ओंजळीने पाणी पिणे म्हणजे ओंगळवाणे वाटू लागले आहे. त्यामुळे आता ओंजळीची जागा बाटलीने घेतली. पण, ओंजळ कमी झाली नाही. ओंजळीने फुले वाहणे, भिक्षा देणे, पाण्याचे अर्घ्य वाहणे या प्रथा अजून सुरक्षित आहेत. त्यामुळे पाणी पिणे हे जरी दुर्मिळ झाले असले, तरी धार्मिक कार्यात त्याचे महत्त्व टिकून आहे.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

सुखी वृद्धापकाळ जगताना...
पर्यटक पर्यटनासाठी स्थळ म्हणून निवडताना निसर्गाने समृद्ध असलेल्या भागाचीच निवड करतात. तद्वतच प्रत्येकाने वृद्धापकाळात निसर्गाप्रमाणे आनंदीत असले पाहिजे. तरुणपणात माणूस शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो. पण, वृद्धापकाळात मात्र तो खचतो. स्त्रियांमध्ये उपजतच मानसिकदृष्ट्या सक्षम, सोशिक व कष्टाळूपणा हे गुणधर्म असतात. त्यामुळे त्या आपला वृद्धापकाळ सहजपणे कंठीत असतात. काही पुरुष मात्र अहंकारी असल्याने त्यांचा वृद्धापकाळ थोडासा खडतर असतो. तेव्हा हा आपला काळ सुखाचा जावा, असे वाटत असेल तर मुलगा-सून अगर मुलगी-जावई यांच्याबरोबर राहताना त्यांच्या संसारात लुडबूड करू नये. त्यांच्या चर्चेत स्वतःहून भाग घेणे, मागितल्याशिवाय सल्ला देणे, उणे-दुणे काढणे, भूतकाळातील घटना या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. आपल्या आवडी-निवडीला मुरड घालावी. घरात स्वच्छ कपड्यात वावरावे. स्वतःचे काम स्वतः करून स्वाभिमानी वृत्ती जोपासावी. वृद्धापकाळ जगण्याचा नसतो, तर जगावयाचा असतो. तेव्हा या काळात स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगायला हवे. यामुळे दुसऱ्यांच्या मनात घर निर्माण होईल आणि तुमचा व इतरांचा आनंद द्विगुणित होईल.
मा. वा. कुलकर्णी, कोल्हापूर

कठीण प्रसंगी मनाचा सल्ला मानावा
कुठल्याही कठीण प्रसंगी निर्णय घेताना आपण आपल्या मनाला विचारावे, त्याचा सल्ला मानावा. असे केले तर आपल्याला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. उपजत ज्ञान व त्या अनुषंगाने आपल्या हातांनी साकारलेले कलानैपुण्य इतरांना साद घालते. आयुष्य हे घुसमटीत न जगता सकारात्मक राहून कलासौंदर्याचा आस्वाद घ्यायला हवा. शोध, बोध, यश व अनुभव आपल्याला खूप काही सांगून जाते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या मनाचा शोध घेण्यासाठी वेळ काढावा. आपले मन ज्या क्षेत्रात रमते, त्यावर लक्ष केंद्रीत करावे. एखाद्या सुंदर विचारानुसार प्रामाणिकपणे कृती केल्यास परिश्रमाचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात, जीवनात येणारा प्रत्येक दिवस ही सोनेरी संधी मानून सर्वांनी आपले उपजत व शैक्षणिक ज्ञान आणि छंद, आवडीनिवडी जोपासत पुढे वाटचाल करावी.
बाजीराव शिंदे, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60133 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top