समुपदेशनाने ५२ कर्मचार्‍यांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुपदेशनाने ५२ कर्मचार्‍यांच्या बदल्या
समुपदेशनाने ५२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

समुपदेशनाने ५२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

समुपदेशनाने १४३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
सोमवारी पदस्‍थापनेचे आदेश; रिक्त पदांमुळे चार तालुके केले ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २१ : जिल्‍हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी शुक्रवारी व शनिवारी समुपदेशन घेण्यात आले. दोन दिवसांच्या समुपदेशनानंतर १४३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांत रिक्‍त पदांची संख्या मोठी असल्याने बदलीसाठी तालुके ब्‍लॉक केले होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची निराशा झाली. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पदस्‍थापनेचे आदेश सोमवारी दिले जाणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई; तसेच त्या-त्या विभागाचे खातेप्रमुख उपस्‍थित होते.

जिल्‍हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात बदलीसाठी समुपदेशन घेण्यात आले. शुक्रवारी सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये यावेळी १४ प्रशासकीय, २५ विनंती व १५ आपसी बदल्या करण्यात आल्या; तर शनिवारी १८ प्रशासकीय , ५७ विनंती व १४ आपसी बदल्यांचा समावेश होता. शनिवारी झालेल्या बदल्यांमध्ये आरोग्य, वित्त, महिला व बालकल्याण, बांधकाम, पशुसंवर्धन; तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्‍यांचा समावेश होता. आरोग्य विभागातील सर्वाधिक म्‍हणजे ४६ कर्मचाऱ्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.
....
तालुके ब्‍लॉक केले, तर अर्ज का घेतले?
प्रशासनाने दुर्गम भागाचे कारण देत शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात बदलीने येण्यास निर्बंध घातले आहेत. हे तालुके वगळून इतर तालुक्यांतील बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्‍यांनी वरील तालुके मागितले त्यांचा भ्रमनिरास झाला. तालुके ब्‍लॉक करायचे होते तर अर्ज कशासाठी घेतले, अशी विचारणा कर्मचारी करत होते. काहींनी तर हा विषय लोकप्रतिनिधीपर्यंत नेला.
...
एकूण झालेल्या बदल्या
प्रशासकीय ३२
विनंती ८२
आपसी २९
एकूण १४३

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60150 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..