महाराजस्व अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराजस्व अभियान
महाराजस्व अभियान

महाराजस्व अभियान

sakal_logo
By

महाराजस्व अभियानातून
जिल्ह्यात लोकसेवेचा जागर
सहभागाचे आवाहन; ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन
कोल्हापूर, ता. २० : प्रशासनाच्या कामामध्ये लोकाभिमुखता, गतिमानता, पारदर्शीपणा, सुसूत्रता, सुलभता येण्यासाठी महाराजस्व अभियान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. नागरिकांचे प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी आणि महसूलवाढीच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित हे अभियान राबविले जात आहे.
जिल्ह्यातील ७६ महसूल मंडलांतील १७३ ठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. आतापर्यंत तहसील कार्यालय व इतर प्रशासकीय विभागांमार्फत १५ शिबिरे झाली आहेत. नागरिकांना प्रशासनाच्या विविध विभागांची कामे, योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

विभागनिहाय निर्गत अर्ज
महसूल विभाग ः १३ हजार २६३, पशुधन विकास ः १ हजार ७६१, वैद्यकीय ः ६ हजार ८८, एकात्मिक बालविकास प्रकल्प ः २५०, राज्य विद्युत वितरण ः १२९, सामाजिक वनीकरण ः ३३०, कृषी ः ८२४, पंचायत समिती कार्यालय ९८१, वन विभाग ः ७९, पाटबंधारे ः ८०, माहिला व बालविकास ः ७२६, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय ः ७ हजार १९९, इतर संकिर्ण ः ३ हजार ७४३, एकंदर -३२ हजार ५५१ आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60172 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top