जयप्रभा स्टूडीओ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयप्रभा स्टूडीओ आंदोलन
जयप्रभा स्टूडीओ आंदोलन

जयप्रभा स्टूडीओ आंदोलन

sakal_logo
By

चित्रपट कलावंताचा
बिंदू चौकात ठिय्या
जयप्रभा स्टुडिओ विक्री प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः चित्रपटसृष्टीचा मानबिंदू असलेला जयप्रभा स्टुडिओच्या स्मृती जोपासल्या जाव्यात पूर्वीप्रमाणे हा स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी खुला करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व कालावंतांनी आज बिंदू चौकात भर पावसात ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यातील चित्रपट कलावंत तसेच महामंडळातील पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओसमोर उपोषण करीत आहेत. दोन दिवसांपासून त्यांनी शहरातील विविध ठिकाणी निदर्शने सुरू केली आहे. त्यानुसार बिंदू चौकात सर्वजण एकत्र आले. त्यांनी जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे अशा घोषणा दिल्या.
जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा झालेला विक्रीचा व्यवहार रद्द करावा. तसेच, सध्या स्टुडिओतील चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे हजारो कलावंतांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला करावा म्हणून गेली ५७ दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे यापुढे आंदोलन अधिक ‘तीव्र’ करण्यात येईल, असा इशारा यावेळी चित्रपट महामंडळाचे संचालक रणजित जाधव यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60173 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top