बावडा सोसायटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा सोसायटी
बावडा सोसायटी

बावडा सोसायटी

sakal_logo
By

बावड्यातील ‘श्रीराम’साठी
२५ जूनला मतदान
---
सोमवारपासून अर्ज; बिनविरोधची परंपरा कायम राहणार?
कसबा बावडा, ता. २१ ः आशिया खंडात नावजलेल्या येथील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी २५ जूनला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता.२३) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने संस्थेचा निवडणूका कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांची निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या संस्थेच्या दोन निवडणुका पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाल्या आहेत. आता राजकीय संदर्भ बदलल्याने व इच्छुकांची संख्या वाढल्याने यावेळी ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याविषयी उत्सुकता आहे.
सद्या संस्थेचा पेट्रोल पंप, स्वस्त धान्य दुकाने, भांडी दुकान, पाणी पुरवठा संस्था, मशागतीसाठी ट्रॅक्टर, मंगल कार्यालय असा व्याप आहे. या संस्थेचे संचालक पद म्हणजे प्रतिष्ठा समजली जाते, त्यातून अनेकांना या संस्थेवर जाण्याची इच्छा असते. २०१० व २०१५ च्या संस्थेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. विद्यमान संचालकांचा कार्यकाल २०२० मध्येच संपला पण कोरोनामुळे मुदतवाढ दिली आहे.
कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर सहकार विभागाने जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू केला. त्यात श्रीराम संस्थेचा समावेश आहे. सर्वसाधारण गटातील १२ व राखीव गटातील पाच अशा १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. संस्थेचे ५ हजार ९३४ सभासद मतदानासाठी पात्र आहेत.
...................
निवडणूक कार्यक्रम असा
*२३ ते २७ मे - उमेदवारी अर्ज दाखल करणे
*३० मे - उमेदवारी अर्जाची छाननी
*३१ मे ते १४ जून - उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
*१५ जून - रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप
*२५ जून - मतदान, सायंकाळनंतर मतमोजणी
.......................
यादीत थकबाकीदारही
संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या प्रारूप व अंतिम मतदार यादीवर एकही हरकत दाखल झाली नव्हती. अंतिम मतदार यादीत काही थकबाकीदार सभासदांचाही समावेश असल्याचे समजते. विशेष म्हणजे यात एका विद्ममान संचालकांचेही नाव असल्याची चर्चा आहे.
............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60330 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..