आंबा दर घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा दर घसरले
आंबा दर घसरले

आंबा दर घसरले

sakal_logo
By

23504

पावसाने पाडला आंब्याचा दर
-------------------
कोकणी हापूस बॉक्स, पेटी; भावात ४० टक्के घट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः कोकणी हापूस आंब्याचे भाव गगनाला भिडले होते; मात्र दोन दिवसांत झालेला पाऊस, वादळीवारा आणि ढगाळ वातावरणाने हापूस आंब्याचे दर पाडले आहेत. आज शाहू मार्केट यार्डात घाऊक बाजारात एक डझन बॉक्सचा दर २५० तर पाच डझन आंबा पेटीचा दर ११०० रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे आंबा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. आज आवकेतही वाढल्याने दर उतरण्यास मदत झाली.
दोन महिन्यांपासून आंब्याचा नवा हंगाम सुरू झाला, यात देवगड, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, कणकवली तसेच रत्नागिरीतून कोकणी हापूस आंबा येत आहे. यंदा सुरुवातीला बहुतांशी आंबा मुंबई बाजारात पाठवला. मोजका माल कोल्हापुरात येत होता. येथे मागणी वाढल्याने बॉक्सचा दर डझन बॉक्सचे ४०० ते ५०० रुपये होते. तर पेटीचे दोन हजारांवर होते.
चार दिवसांत मात्र कोकणात ढगाळ वातावरण झाले. पाऊस पडला. आंब्याच्या अडी खराब होऊ लागल्याने बहुतांशी आंबा जवळची बाजारपेठ म्हणून कोल्हापुरात आणला. एका पेटीत एक दोनआंबे डागाळले, की इतर आंबेही खराब होतात. यातून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आज दर जवळपास ४० टक्क्यांनी कमी करून आंबा बॉक्सची विक्री झाली.
शहरातील अन्य किरकोळ फळ विक्रीच्या स्टॉल्सवर २५० ते ३०० रुपये असाच बॉक्स भाव होता तर पेटीच भाव १५०० रुपये होते.
वास्तविक कोकणच्या हापूस आंब्‍याला ‘जीआय'' मानांकन मिळाला आहे. त्यामुळे मागणी वाढती असते. अशात जादा नफा कमावण्यासाठी काही व्यापारी देवगड हापूस अशी ठळक अक्षरे छापलेल्या बॉक्समध्ये कारवार, धारवाड, मद्रासकडून येणारा आंबा मिक्स करतात. हा असा प्रकार सुरूच आहे.

‘‘पावसामुळे आंबा खराब होण्याची शक्यता असल्याने कमी भावात आंब्याची विक्री केली जात आहे. बागायतदार व विक्रेते नुकसान टळण्यासाठी ही भाव कमी आले आहेत. एवढाच विषय आहे. ’’
- रफिक बागवान, फळ विक्रेता


आंबा जत्रेत तीन दिवसांत
२२ लाखांवर उलाढाल
कोल्हापूर : जत्रा आंब्याची उपक्रमात तीन दिवसांत २२ लाखांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. आंब्याची २२ मेट्रिक टन विक्री झाली असून, उद्या (ता. २२) जत्रेचा शेवटचा दिवस आहे. जिल्हा प्रशासनातर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वातंर्गत श्री शाहू छत्रपती मिल येथे त्याचे आयोजन केले आहे. बांधावरून थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांच्या आंब्याला शाहू मिल येथे थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून माफक दरात उपलब्ध केलेल्या आंबा खरेदीसाठी कोल्हापूरकर भेट देत आहेत. जत्रेत देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या यांसह केट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दुधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम आदीसह वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे उपलब्ध आहेत. तिसऱ्या दिवसाअखेर तब्बल २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60401 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..