नाले सफाई बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले सफाई बातमी
नाले सफाई बातमी

नाले सफाई बातमी

sakal_logo
By

महापालिका फोटो
शहरातील ६७ प्रभागांतील
चॅनेलची सफाई पूर्ण
---
प्रशासनाचा दावा ; १ हजार ४८० टन गाळ काढला,

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः शहरातील ६७ प्रभागांतील चॅनेलची सफाई पूर्ण झाली असून त्यातून १ हजार ४८० टन गाळ काढला आहे. ३१ मे पूर्वी सर्व चॅनेलची सफाई पूर्ण करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. याबाबत तक्रार असल्यास महापालिकेशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याचे प्रसिद्धीपत्रक प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, महापालिकेने चॅनेल सफाईसाठी मोहीम घेतली आहे. या अंतर्गत सुरू असणाऱ्या २१ नाल्यांमधून पोकलॅनव्दारे साफसफाई करण्यात येत असून त्यातील १६ नाल्यांचे, चॅनेलचे काम पूर्ण झाले. २६० चॅनेलची स्वच्छता जेसीबीने सुरू असून त्यातील १६५ ठिकाणचे काम पूर्ण झाले.
४६७ नाल्यांची स्वच्छता आरोग्य विभागातील कर्मचारी करत आहेत. त्यापैकी ३८० ठिकाणचे काम पूर्ण झाले. १७ मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू झाले.
एकूण कामांपैकी ७५ टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित काम ३१ मे अखेर पूर्ण होईल. सर्व वॉर्डसाठी चॅनेल सफाईसाठी महापालिकेच्या इतर विभागाकडील अधिकारी यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामाचे नियंत्रण व पर्यवेक्षण केले जाणार आहे.

--
या क्रमाकांवर
संपर्क करा
नालेसफाईबाबत काही सूचना किंवा तक्रारी असल्यास नागरिक ९७६६५३२०३७ यानंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून नोंदवू शकतात. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे.


रविवारीही नाले सफाई
महापालिकेने मॉन्सूनपूर्व नाले सफाई व स्वच्छता कामाला सुरुवात केली आहे. आज उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी झूम कचरा प्रकल्प, रिलायन्स मॉल परिसर, सीपीआर चौक येथे फिरती करून पाहणी केली. कालच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर चॅनेल व नाला साफसफाईबाबत आवश्यक त्या सूचना आरोग्य निरीक्षक यांना दिल्या. यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, मनोज लोट उपस्थित होते. तसेच रविवारी (ता.२२) महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सुटी रद्द केली आहे. मॉन्सूनपूर्व स्वच्छताकामी आरोग्य घनकचरा व्यवस्थापनाचे कचरा संकलन, कचरा उठाव, चॅनेल व नाला साफसफाई व स्वच्छता संबंधी कामकाज रविवारी सुरू ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60411 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..