केएमटी बस दररोजच ब्रेकडाऊन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KMT Bus
केएमटी ब्रेकडाऊन

केएमटी बस दररोजच ब्रेकडाऊन

कोल्हापूर - मटेरियल मिळत नसल्याने तसेच कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे शहरवासीयांसाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था असलेल्या केएमटी पाठीमागे ब्रेकडाऊनचे शुक्लकाष्ठ कायम लागले आहे. दररोज किमान चार ते पाच बस ब्रेकडाऊन होत असल्याने मुळात रस्त्यावर कमी येत असलेल्या बसच्या नियोजनात विस्कळीतपणा येत आहे. त्यामुळे ऐनवेळी एखाद्या मार्गावरील बस कमी करून दुसरीकडे वळवावी लागत असल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे.

केएमटीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न चालवले आहेत. ५६-५७ इतक्या बस दररोज धावत असतात; पण ती संख्या ७५ वर नेण्याचे टार्गेट आहे. काही जुन्या बस आयुर्मान संपल्याने बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे बसची संख्या कमी होत गेली. त्यातच मटेरियल मिळत नसल्याने काही बस थांबवून ठेवण्याची नामुष्की येत आहे. परिणामी दररोज रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज असलेल्या बसची सकाळी वर्कशॉपमधून बाहेर पडताना संख्या एक असते व दुपारपर्यंत त्यात घट होत जाते. अनेकवेळा एका बसचे ब्रेकडाऊन होण्याचे कारण रिपीट होत आहे. जादा प्रवाशी संख्या घेऊन जाऊ शकत नाही, डिझेल गळती, इलेक्ट्रिकल समस्या, पंक्चर, टायर अशा विविध कारणांनी बस ब्रेकडाऊन होत आहेत.

मटेरियल मिळत नसल्याने ती बस बंद ठेवण्यापेक्षा बंद असलेल्या बसचा पार्ट काढून बस सुरू केली जाते; पण एखाद्या टप्प्यापर्यंत ही जुळवाजुळव चालते. तो पार्ट उपलब्ध झालाच नाही तर मात्र प्रशासनाची अडचण होते. त्याबरोबर कर्मचाऱ्यांची कमी झालेली संख्या ही मोठी समस्या आहे. क्लीनर, हेल्पर्सना घेऊन वर्कशॉप दररोजची लढाई लढत असते. यासाठी वर्कशॉपला जर मनुष्यबळ व मटेरियल मिळाले तर कमी असलेल्या उपलब्ध बस व्यवस्थित धावतील.

अप्रेंटीसशिपचा आधार घ्यावा
केएमटीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे काम करत करत आता क्लीनर, हेप्लर्स प्रशिक्षित झाले आहेत. कर्मचारी कमी खर्चात उपलब्ध होण्यासाठी अप्रेंटीसशिप सुरू करता येऊ शकते. त्याचा विचार होण्याची गरज आहे.

दररोज धावणाऱ्या बस ५६ ते ५९

वर्कशॉपमधील कर्मचारी ८०

सध्या उपलब्ध मनुष्यबळ, मटेरियलच्या जोरावर बस ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणखी पाठबळ मिळाल्यास निश्‍चितच सध्याचे प्रमाणही कमी होईल.
- किरण चव्हाण, वर्क्स मॅनेजर, केएमटी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60476 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top