अवनी संस्थेतर्फे पुरस्कार वितरण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवनी संस्थेतर्फे पुरस्कार वितरण कार्यक्रम
अवनी संस्थेतर्फे पुरस्कार वितरण कार्यक्रम

अवनी संस्थेतर्फे पुरस्कार वितरण कार्यक्रम

sakal_logo
By

23768
कोल्हापूर : (स्व.) प्रा. अरुण चव्हाण यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ समाजरत्न पुरस्कार मधुकांत पतारिया यांना प्रदान करताना दीपक नागरगोजे, हेरंब कुलकर्णी, व्यंकप्पा भोसले, अनुराधा भोसले, संजय पाटील, दिलीप सव्वाशे आदी.

अवनि’तर्फे पथारिया यांना ''समाजरत्न'' पुरस्कार प्रदान
कोल्हापूर, ता. २२ : अवनि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (स्व.) प्रा. अरुण चव्हाण यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकांत पथारिया यांना ''समाजरत्न'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यंकप्पा भोसले, नगर येथील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, बीड येथील दीपक नागरगोजे, अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, दिलीप सव्वाशे यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. पथारिया यांना प्रदान करण्यात आला.
‘वंचित व स्थलांतरित बालकांच्या शिक्षणासमोरील आव्हाने व उपाय’ यावर परिसंवादाचे आयोजन केले. महावीर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरद गायकवाड, श्री. कुलकर्णी, श्री. नागरगोजे, प्रकाश गाताडे, सात्ताप्पा मोहिते आदी संवादकर्ते म्हणून लाभले.
श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘हंगामी स्थलांतरीत बालकांना कायद्याचे संरक्षण नाही. कष्टाच्या मानाने त्या मुलांना अजूनही मजुरी मिळत नाही, हे वास्तव आहे. अशा स्थलांतरीसाठी हंगामी शिक्षणावर भर दिला पाहिजे. यासाठी शासनानेही पाठपुरावा करायला हवा.
मानपत्राचे वाचन अन्नपूर्णा कोगले यांनी केले. इम्रान शेख, निमेश गवळी, जैनुद्दीन पन्हाळकर, कौशल्या आंग्रे, शाहरुख आटपाडे, अविनाश शिंदे, अवनी संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी आदींनी नियोजन केले. वनिता कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60649 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top