पावसाचा अंदाज घेवूनच पेरण्या करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा अंदाज घेवूनच पेरण्या करा
पावसाचा अंदाज घेवूनच पेरण्या करा

पावसाचा अंदाज घेवूनच पेरण्या करा

sakal_logo
By

पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या करा
कृषी विभागाचे आवाहन; जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व वातावरण
कोल्हापूर, ता. २२ : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर पेरण्यांना सुरवात झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही, तरीही वीजपंपाद्वारे पाणी देण्याची सोय आहे; तसेच केवळ पावसावर अवलंबून असणाऱ्या पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून केले आहे .जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेतीला पोषक असला, तरीही वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारा ठरला. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले आहे, तरीही सध्या झालेल्या पावसाचा आधार घेत शेतकरी पेरण्या करत आहेत. या पेरण्या माळरानात केल्या असतील, तर त्यांना फटका बसू शकणार आहे. पेरण्या झाल्यानंतर पाऊस वेळेत झाला नाही, तर पेरणी वाया जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तेव्हा माळरानात पेरणी करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. ज्यांच्याकडे पावसाशिवाय बियांना पाणी देण्याची व्यवस्था आहे, त्यांनीही वेळेपूर्वी पेरणी करण्याआधी विचार करावा, असेही आवाहन केले आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व वातावरण तयार होत आहे. काही ठिकाणी पेरणी करण्यासाठी आवश्‍यक शेती तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम आठ ते दहा दिवसांत पूर्ण होणार आहे.


ेशेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. ज्या ठिकाणी पाणी देण्याची सोय नाही. अशा ठिकाणी पेरणी वाया जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी.
ज्ञानदेव वाकुरे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60671 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top