महाविकास आघाडीकडून ओ.बी.सी आरक्षणाचा खून ः भाजप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीकडून ओ.बी.सी आरक्षणाचा खून ः भाजप
महाविकास आघाडीकडून ओ.बी.सी आरक्षणाचा खून ः भाजप

महाविकास आघाडीकडून ओ.बी.सी आरक्षणाचा खून ः भाजप

sakal_logo
By

२३८२१

आघाडीकडून ओबीसी आरक्षणाचा खून
विजय जाधव यांचा आरोप; भाजप ओबीसी आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही वेळेत केली नाही. त्यामुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. त्यानंतरही मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षण परत मिळवले तेही महाविकास आघाडी सरकारला करता आले नाही. महाविकास आघाडीने एकप्रकारे ओबीसी आरक्षणाचा खून केला, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी केला. भाजप ओबीसी आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जाधव बोलत होते.
राज्यभर भाजपच्या ओबीसी आघाडीतर्फे महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शने केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा दिल्या.
जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. मध्यप्रदेश ट्रिपल टेस्ट पद्धतीने कार्यवाही करत आरक्षण मिळवले. पण महाराष्ट्र सरकारने यातील काहीच केले नाही. त्यामुळे ओबीसींचे हक्काचे राजकीय आरक्षण त्यांना मिळू शकले नाही. महाविकास आघाडीने एक प्रकारे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली आहे.’’
भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यायचे नाही. त्यांना धनदांडग्यांचे राजकारण करायचे आहे. महाविकास आघाडीचे हे कारस्थान ओबीसी समाजाच्या लक्षात आले आहे. भविष्यात ओबीसी समाज मतदानातून महाविकास आघाडीला धडा शिकवेल.’’
सरचिटणीस हेमंत अराध्ये, अशोक देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
महेश यादव, राजाराम परीट, अरविंद वडगावकर, अभिजित पोवार, दीपक पेटकर, प्रकाश तारे, सतीश यादव, संदिप तुषार, प्रदीप उलपे, चंद्रकांत घाटगे, गिरीश साळोखे, विवेक वोरा, सुनील पाटील, रोहित कांबळे, दिलीप मैत्राणी, आशिष कपडेकर यांच्यासह महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60733 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..