
बेकायदेशीर प्रार्थनास्थळाच्या बांधकामावर कारवाई करा
23814
बेकायदेशीर प्रार्थनास्थळाचे
बांधकाम पाडा
--
हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांची मागणी ; हॉकी स्टेडियम चौकात आंदोलन
कोल्हापूर, ता. २३ ः हॉकी स्टेडियम जवळील शाहू कॉलमीमधील रि.स.नं ५९९ बी वॉर्ड या जागेवर प्रार्थनास्थळाचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरू आहे. हे बांधकाम पाडून संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी केली. यासाठी हॉकी स्टेडियम चौकात आंदोलन केले. महापालिका प्रशासनाने शुक्रवार (ता.२७) पर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले.
हॉकी स्टेडीयम चौकातून रामानंदनगर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शाहू कॉलनी मधील एका मोकळ्या जागेवर कंपाऊंड बांधले आहे. या जागी एक बेकायदेशीर प्रार्थनास्थळ उभारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप हिंदुत्त्ववादी संघटना आणि परिसरातील नागरिकांनी केला. आज हॉकी स्टेडियम चौकात परिसरातील नागरिक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी इथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आणि प्रशासनाने त्यांना यापासून रोखले. आणि त्या बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याबाबत परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रिकामी जागा आहे. पूर्वी इथे कचरा कोंडाळा होता. त्यानंतर कचरा कोंडाळा काढण्यात आला. त्यानंतर काही लोक एकत्र येऊन इथे प्रार्थना करू लागले. त्यानंतर त्यांनी इथे पत्र्याचे शेड उभे केले. आता या जागेला कुपण बांधून त्यांनी इमारत बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुजित भाईक आणि अक्षय अटकर यांनी बांधकामावर शुक्रवारपर्यंत कारवाई करतो तसेच संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी सचिन पडळकर, प्रमोद कांबळे, संतोष निकम, साई पडळकर, संभाजी उर्फ बंडा साळोखे, सुरेश तलवार, मनोज नलवडे, अवधू भाट्ये, अनिरुद्ध कोल्हापुरे, हर्षद कुंभोजकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60780 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..