राज्यातील सुत गिरण्या ठेवणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील सुत गिरण्या ठेवणार बंद
राज्यातील सुत गिरण्या ठेवणार बंद

राज्यातील सुत गिरण्या ठेवणार बंद

sakal_logo
By

राज्यातील सूतगिरण्या ठेवणार बंद
कापूस दरवाढीचे संकट; वस्त्रोद्योगावर परिणाम होण्याची भीती
इचलकरंजी, ता. २३ ः कापूस दरात झालेल्या अनियंत्रित दरवाढीमुळे महाराष्ट्रातील सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. या दरवाढीचा जबर फटका यंत्रमाग उद्योगालाही बसत आहे. देशात कापसाचे कमी उत्पादन झाल्यामुळे ही परिस्थीती निर्माण होत आहे; पण याचा गैरफायदा कापूस व्यापारी घेत असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडून कृत्रिम टंचाई निर्माण करीत कापसाच्या दरात भरमसाट वाढ केली जात आहे.
सध्या खुल्या बाजारात कापसाचा दर विक्रमी असा एक लाख दहा हजार इतका प्रती खंडी झाला आहे. परिणामी, याचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सूतगिरण्या बंद ठेवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परिणामी, याचा परिणाम संपूर्ण वस्त्रोद्योगावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाचा हमी भाव प्रति क्विंटल ६ हजार ५० रुपये, असा ठरवून दिला आहे; परंतु खुल्या बाजारात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून १३ हजार दर मिळत असल्यामुळे शेतकरी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकत आहेत. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार असल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सगळा कापूस खुल्या बाजारात विकून संपवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नाही, अशी स्थिती आहे.
सूतगिरणी व्यवस्थापन कापूस खरेदीसाठी बाजारात फिरत आहे; परंतु बाजारपेठेत कापसाची प्रचंड टंचाई जाणवत आहे. सध्या सूतगिरण्यांकडे आठ दिवस पुरेल इतकाच कापूस शिल्लक आहे. ही परिस्थिती बदलेल, अशी स्थिती सध्या तरी दिसून येत नाही. कापूस व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात योग्य दरात कापूस मिळेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे जूनपासून महाराष्ट्रातील सूतगिरण्या बंद पडण्यास सुरुवात होती, अशी माहिती आहे.
----------
दक्षिण भारतातील सूतगिरण्या बंद
कापसाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे दक्षिण भारतातील सूतगिरण्या बंद ठेवल्या आहेत. कापसाचे नवीन उत्पादन येईपर्यंत सूतगिरण्या बंद ठेवल्या जाणार आहेत. या धर्तीवर महाराष्ट्रातील सहकारी व खासगी सूतगिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी अनेक सूतगिरण्यांच्या चालकांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्याकडे केली आहे.
------
मंत्री शेख यांची भेट घेणार
कापूस टंचाईच्या प्रश्नावर दोन दिवसांत महाराष्ट्रातील सूतगिरणी चालकांचे शिष्टमंडळ वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची भेट घेणार आहेत. शासन पातळीवर याबाबत मदत मिळण्याची आशा आहे. त्यांच्या भेटीनंतर सूतगिरण्या बंद ठेवण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
---------

या वर्षी कापसाचे दर वाढल्याने काही कापूस व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन साठेबाजी केली आहे. दरवाढ करून बाजारात जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यापाऱ्यांवर राज्य व केंद्र सरकारने कारवाई करून कापूस रास्त भावात खुल्या बाजारात उपलब्ध करून द्यावा.
- अशोकराव स्वामी, अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ, महाराष्ट्र राज्य
-------
महाराष्ट्र सूतगिरण्या दृष्टिक्षेप
सहकारी - ७२
खासगी - ४०
---
पश्चिम महाराष्ट्र सहकारी सूतगिरण्या
कोल्हापूर - १६
सांगली -४
सातारा - ४
सोलापूर - ६

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60804 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..