‘रवळनाथ’ने आंतरराष्ट्रीय व्हीजन पहावे ः डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’ने आंतरराष्ट्रीय व्हीजन पहावे ः डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे
‘रवळनाथ’ने आंतरराष्ट्रीय व्हीजन पहावे ः डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे

‘रवळनाथ’ने आंतरराष्ट्रीय व्हीजन पहावे ः डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे

sakal_logo
By

23898

‘रवळनाथ’ने आंतरराष्ट्रीय व्हीजन पाहावे
डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे; रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या रौप्यमहोत्सवाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीने गेल्या अडीच दशकांचे सिंहावलोकन करण्याबरोबरच पुढील २५ वर्षांतील वाटचालीचा रोडमॅप ठरवून आता देशभर शाखा विस्तारासह आंतरराष्ट्रीय व्हीजन पाहावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज येथे केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी सांगता सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, राष्ट्रीय सहकारी संघाच्या कार्यकारी संचालिका सावित्री सिंह, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, सीईओ डी. के. मायदेव व्यासपीठावर होते.
डॉ. मुळे म्हणाले, ‘‘रवळनाथने गुणवत्तेच्या जोरावर स्वत:चा ब्रँड निर्माण केला आहे. भविष्यात लोकसहभागातून समाजिक विकास साधणे, तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे पुढे जाणे, आर्थिक क्षेत्रातील नवीन संकल्पनाद्वारे शाखांचा विकास साधण्याचा प्रयत्न रवळनाथने करावा.’’
कवडे म्हणाले, ‘‘रवळनाथने सर्वच क्षेत्रांतील माणसे संस्थेशी जोडली आहेत. प्रत्येकाला घर देण्याच्या शासन योजनेला बळही दिले आहे.’’ मराठे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील हौसिंग फायनान्सची रवळनाथ ही देशातील एकमेव संस्था आहे. सर्वांना घरे मिळावीत या संकल्पपूर्तीसाठी ग्रामीण भागातही फोकस करायला हवा. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ रवळनाथच्या सभासदांना मिळावा म्हणून पाठपुरावा करू.’’
सावित्री सिंह म्हणाल्या, ‘‘सहकारात महाराष्ट्र रोल मॉडेल आहे. रवळनाथने २५ वर्षांत केलेली प्रगती गतिशील आणि यशस्वी आहे. गरिबातील गरीब माणसांना व महिलांना सहकाराच्या प्रवाहात आणण्याची मोहीम रवळनाथने सुरू करावी.’’
संस्थापक अध्यक्ष श्री. चौगुले यांनी प्रास्ताविकात भविष्यात दिल्ली व गोवा कार्यक्षेत्रासह पुण्यात शाखा सुरू करण्याचा मानस असून गृह कर्जदारांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावेळी ‘यशोगाथा’ स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. मुळे यांच्या हस्ते झाले. शाखा अध्यक्ष, संस्थापक-संचालकांचा सत्कार झाला. डॉ. दत्ता पाटील यांनी स्मरणिकेची माहिती दिली. मीना रिंगणे यांनी स्वागत केले, किरण पाटील व रेखा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
चौकट
तंटामुक्त सहकार
कवडे म्हणाले, ‘‘सहकारात मूल्य व्यवस्थेचे पालन आवश्यक आहे. राज्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये तंटा, वाद-विवाद होतात. त्याचा परिणाम आर्थिकतेवर होतो. त्यामुळे सहकारात सुप्रशासित, तंटामुक्त सोसायटी करण्यासाठी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. पतसंस्थेतील ठेवींना संरक्षण देण्यासह कर्जदारांचे सिबील तपासणी धोरणावरही चर्चा सुरू आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60819 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top