एसटी बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बँक
एसटी बँक

एसटी बँक

sakal_logo
By

लोगो
टुडे भाग - ५


सर्व कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी प्रयत्नशील
--
संदीप शिंदे ; एसटी बँक कर्मचाऱ्यांचीच, इतरांचा हस्तक्षेप नाही


कोल्हापूर, ता.२३ ः एसटी बँक ही एसटी कर्मचाऱ्यांनी, एसटी कर्मचाऱ्यां‍च्या हितासाठी चालवलेली बँक आहे. बँकेत सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा करीत आहोत. एसटी बँकेच्या सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठीही आम्ही संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करत असून त्याला यश येईल, अशी अपेक्षा आहे. अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ‘सकाळ''शी बोलताना दिली.
चार दिवस ‘सकाळ''मधून एसटी बँकेच्या गैरसोयविषयी वृत्तमालिका सुरू आहे, याबाबत श्री. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, एसटी बँक ही एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्थापन झाली आहे. साडेचार हजार कोटी रुपये उलाढाल होते. यात एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ कर्ज पुरवठा केला जातो. त्या कर्जाचे हप्ते पगारातून वजा केले जातात. त्यामुळे कर्ज पुरवठा व वसुली यांचे प्रमाण चांगले आहे.
ते म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास असल्यामुळेच अडीच हजार कोटींच्या ठेवी कर्मचाऱ्यांनी बँकेकडे ठेवल्या आहेत. यातील दोन हजार कोटी ठेवींना ८ टक्के व्याजदराने तर ५०० कोटी ठेवी १० टक्के दराने व्याज दिले जाते. कर्ज तत्काळ कर्ज हे तीन लाखांपर्यंत दिले जाते तर हाऊसिंग लोन ,परदेशी शिक्षणासाठी कर्ज आदी कारणांसाठी दिली जाणारी कर्जे यांचा व्याजदर ९ ते ११.५० टक्के आहे. तीन टक्‍क्‍यांवर व्यवसाय केला जातो.
एसटीच्या आजवरच्या इतिहासात एसटी बँकेचा अध्यक्ष हा आयएएस अधिकारी हेच आहेत. एसटीचे महाव्यवस्थापक दर्जाचे दोन अधिकारी तसेच विभाग नियंत्रक या दर्जाचे चार अधिकारी असे उच्च अधिकारी निर्णय प्रक्रियेशी संबंधित असतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार थकबाकीदारांना येणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही अशा सूचना आल्या आहेत, मात्र पाच महिने कर्मचारी संप असल्यामुळे त्यांना वेतन नव्हते. त्यामुळे ते थकबाकीत गेले ही बाब विचारात घेऊन हे कर्मचारी मतदानासाठी पात्र होतील, यासाठी कायदेशीर पाठपुरावा करीत आहोत. (समाप्त)

............
राजकीय पक्षांशी संबंध नाही
एसटी बँकेवर काही राजकीय व बाह्य संघटनात्मक नेते आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र एसटी बँक ही एसटी कर्मचाऱ्यांनी चालवलेली आहे. घटना बदलामुळे या बँकेचा अध्यक्ष आएएस दर्जाचा असावा लागतो; त्यामुळे या बँकेत बाहेरचा कोणताही घटक सहजपणे प्रवेश करू शकत नाही. इतर कोणत्याही राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्याचा या बँकेशी दुरान्वयेही संबंध नाही, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
.............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60899 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..