टागोर वाचनालयाला शासन मान्यता कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टागोर वाचनालयाला शासन मान्यता कधी?
टागोर वाचनालयाला शासन मान्यता कधी?

टागोर वाचनालयाला शासन मान्यता कधी?

sakal_logo
By

23984
23986

------------------
टागोर वाचनालयाला शासन मान्यता कधी?
अनुदानासह विविध लाभांपासून वंचित; नवीन नोंदणी बंद असल्याचा फटका

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ ः येथील पालिकेच्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाला अद्यापही शासनाची मान्यता मिळालेली नाही. याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे; पण नवीन ग्रंथालयांची नोंदणी बंद असल्याचे कारण सांगितले जात आहे. परिणामी, हे वाचनालय विविध माध्यमातून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहिले आहे. विशेष म्हणजे २००७ मध्ये ग्रंथालयाला अनुदान मिळण्याबाबतचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर या वाचनालयाची नोंदणीच शासनाकडे नसल्याचे समोर आले. त्यानंतरही अनेक वर्षांपासून हा प्रश्न आजही मार्गी लागलेला नाही.
शहरात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक ग्रंथालयांची उभारणी केली आहे. त्यामुळे शहरातील वाचन चळवळ तशी समृद्ध आहे. इचलकरंजी पालिकेनेही १९९५ मध्ये गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय सुरू केले. १७ लाख रुपये खर्च करून वाचनालयाची इमारत उभी केली आहे. अत्यंत सुसज्ज अशी ही इमारत आहे. विपुल ग्रंथसंपदाही आहे. सोबत अभ्यासिकेची सोय येथे केली आहे. वाचनालयामुळे इतर वाचकांबरोबरच पालिका कर्मचाऱ्यांनाही वाचनाची गोडी लागली आहे.
तथापि, या ग्रंथालयाची अद्याप शासनाच्या मान्यताप्राप्त ग्रंथालयाच्या यादीत नोंद झालेली नाही. त्याचा फटका आजही या ग्रंथालयास बसत आहे. शासनाच्यावतीने ग्रंथालयांना विशेष अनुदान दिले जाते; पण नोंदणी नसल्यामुळे आजपर्यंत एक रुपयाचेही अनुदान शासनाकडून मिळालेले नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खासदार, आमदार फंडातून ग्रंथालयास पुस्तके देता येतात; पण शासनाकडे या ग्रंथालयाची अधिकृत नोंदणी नसल्यामुळे अशा फंडातून पुस्तके मदत करण्यावर मर्यादा आल्या आहेत. पालिका फंडावरच या ग्रंथालयाची मदार आहे.
-----
शासन नोंदणीसाठी प्रयत्न आवश्यक
वाचनालयातील विविध सुविधांबाबत प्रयत्न होताना दिसत आहेत; पण त्याचबरोबर या वाचनालयाच्या शासन पातळीवरील नोंदणीबाबत सर्व पातळ्यांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. शहरातील ग्रंथालय मंजुरीचा कोटा पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाकडून विशेष बाब म्हणूनच त्याला मंजुरी दिली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केल्यास ते शक्य आहे.
--
नवीन मान्यता नसल्याने अडसर
पालिकेने शासनाकडे अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव २००७ मध्ये सादर केला; पण मान्यता नसल्यामुळे अनुदान मिळालेले नाही. त्यानंतर मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी आठ महिन्यांपूर्वी वाचनालयाला अ वर्ग दर्जा देऊन नोंदणी करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यावर ग्रंथालय विभागाच्या सहाय्यक संचालकांनी २२ मार्च २०१३ च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक ग्रंथालयांना नवीन मान्यता देणे व दर्जा वाढ देणे बंद केल्याचे कळवले आहे.
-------
गुरुवर्य टागोर वाचनालय दृष्टिक्षेप
एकूण ग्रंथसंपदा - २५,७४२
सभासद - २७०
अभ्यासिका सभासद - १२००.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60918 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top