कोल्हापूर अंचल तर्फे ''कस्टमर आऊटरीच प्रोग्रॅम'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर अंचल तर्फे ''कस्टमर आऊटरीच प्रोग्रॅम''
कोल्हापूर अंचल तर्फे ''कस्टमर आऊटरीच प्रोग्रॅम''

कोल्हापूर अंचल तर्फे ''कस्टमर आऊटरीच प्रोग्रॅम''

sakal_logo
By

23990
कोल्हापूर : बँक ऑफ महाराष्ट्र कोल्हापूर अंचल तर्फे आशिष पांडे यांचे स्वागत करताना अभिनव काळे सोबत मान्यवर. 

बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे
''कस्टमर आऊटरीच प्रोग्रॅम''

कोल्हापूर, ता. २३ :  बॅंक ऑफ महाराष्‍ट्र, कोल्हापूर झोनतर्फे कोल्हापूर येथे कस्टमर आऊटरीच प्रोग्रॅम बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांच्या उपस्थित झाला.
यावेळी श्री. पांडे यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली. त्यांनी बॅंकेच्या विविध ग्राहकांच्या कार्यालयास भेट दिली. टेकस्टाईल इंडस्ट्रिज्‌मधील किस्मत टेक्स्टाईल यांच्या इचलकरंजी येथील युनिटला भेट देऊन व्यवसायाबाबत प्रत्यक्ष चर्चा केली.
या प्रोग्रॅम अंतर्गत कोल्हापूर अंचलतर्फे ग्राहकांना २२ कोटींचे कर्ज वाटप केले. या दरम्यान त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. अंचल प्रबंधक अभिनव काळे यांनी ग्राहकांना बॅंकेच्या विविध योजनांची माहिती दिली. यानंतर श्री. पांडे यांनी कोल्हापूर विभागीय कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कामाचा आढावा घेतला. कोल्हापूर व सांगली परिसरामधील भविष्यातील संधी व बॅंकेची वाटचाल याबाबत कर्मचार्‍यांशी चर्चा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60936 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..