महामस्तकाभिषेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामस्तकाभिषेक
महामस्तकाभिषेक

महामस्तकाभिषेक

sakal_logo
By

२४००३

तिर्थांकर मूर्तीचा महामस्तकाभिषेक
----
जैनमठात भाविकांची गर्दी; चार वर्षांनी झाला सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : शुक्रवार पेठेतील जैन मंदिरात तीर्थंकरच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात झाला. लक्ष्मीसेन महास्वामीजीचे निर्वाण आणि दोन वर्षांचा कोरोनाचे निर्बंध यामुळे तब्बल चार वर्षांनी हा महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात झाला. त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
लक्ष्मीसेन जैन मठात रविवारी संध्याकाळी तीर्थंकर बृहत मूर्तीवर वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा मंगलमय वातावरणात आणि प्राचीन परंपरेत झाला.
यावेळी श्रावकांकडून मूर्तीवर दूध, उसाचा रस, हळद, कुंकू, वनौषधी, चंदन, पुष्प यांचा अभिषेक घालण्यात आला.
लक्ष्मीसेन मठ हा प्राचीन मठ आहे. प्रथम भट्टारक करवीर पीठ अशी याची ओळख आहे. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी संस्थानमठ कोल्हापूर, रायबाग, होसूर, बेळगाव अशा धर्मगुरू प्रथम भट्टारक पीठाच्या प्रांगणात २८ फूट उंचीची खड्गासनस्थित तीर्थकर मूर्तीवर महामस्थभिषेक सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. चार वर्षांपासून मात्र ही परंपरा खंडित झाली होती. रविवारी संध्याकाळी श्रावकांच्या उपस्थितीत प्रथम पुन्हा सुरू झाली. बृहत महामस्तकाभिषेक करण्यासाठी श्राविकांची रीघ लागली होती. मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी याच्या आयोजनची परंपरा आहे.
प्रफुल्ल शिराळे, पिंटू थिटे, चेतन रोढे, पुषमा कुणे, कमलाकर, प्रसाद देसाई, संदीप अग्रणे, अनिल पाटील, सूर्यकांत तपकिरे, वडगावे व शिराळे परिवार, सुनील नागावकर, निगवे परिवार, आदित्य प्रशांत एकाडे, शिल्पा पिराळे, पद्मजा नाईक यांच्या हस्ते विविध विधी झाले. सोहळ्याच्या आयोजनात संजय आडके, किरण तपकिरे, अमृत संदीप अथणे, सूरज नाईक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60959 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top